6,6,6,6,6,6..! आयपीएल स्पर्धा सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकरांचा विक्रम, जाणून घ्या कधी घडलं

आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार संपला असून आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेध लागले आहेत. असं असताना आयपीएल स्पर्धा सुरू असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर सहा षटकारांचा विक्रम रचला गेला. कसं काय ते जाणून घ्या सविस्तर

6,6,6,6,6,6..! आयपीएल स्पर्धा सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकरांचा विक्रम, जाणून घ्या कधी घडलं
6,6,6,6,6,6..! आयपीएल स्पर्धा सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकरांचा विक्रम, जाणून घ्या कधी घडलं
Image Credit source: Nepal Cricket Twitter
| Updated on: Jun 01, 2026 | 7:49 PM

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकारांचा विक्रम काही नवीन नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा विक्रम अनेकदा रचला गेला आहे, टी20 लीग स्पर्धेतही या विक्रमाची नोंद झाली आहे. सिक्सर किंग युवराज सिंगने ही कामगिरी 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर असा विक्रम अनेकदा रचला गेला आहे. आता या विक्रमात आणखी एक भर पडली आहे. नेपाळचा फलंदाज कुशल भुरटेल याने सहा षटकार मारले आहे. एकाच षटकात सहा षटकार मारणारा नेपाळचा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी नेपाळच्या दीपेंद्र सिंह आरीने सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर युवराज सिंहच्या यादीत सहभागी झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी कामगिरी करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.

चीनविरुद्धच्या सामन्यात रेकॉर्ड

नेपाळ आणि चीन यांच्यात 31 मे रोजी सिंगापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात हा सामना पार पडला. एशियन्स गेम्स मेन्स टी20 पात्रता फेरीत सहा षटकारांचा कारनामा घडला. नेपाळने प्रथम फलंदाज करताना 20 षटकात 2 गडी गमवून 313 धावा केल्या. यात कुशल भुरटेलने मोठी खेळी केली. कुशलने झुओ यूच्या नवव्या षटकात सहा षटकार मारले. त्या षटकात एका वाईडसह एकूण 37 धावा काढल्या. कुशल भुरटेलने 43 चेंडूत 129 धावा केल्या. त्याने 300च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. दरम्यान, विजयी धावांचा पाठलाग करताना चीनचा संघ 92 धावांवर सर्वबाद झाला. नेपाळने हा सामना 221 धावांनी जिंकला.

एका षटकात 6 षटकार मारणारे खेळाडू

  • युवराज सिंग (भारत) – विरुद्ध इंग्लंड, 2007
  • किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज) – विरुद्ध श्रीलंका, 2021
  • दीपेंद्र सिंग आरी (नेपाळ) – विरूद्ध कतार, 2024
  • डॅरियस व्हिसेर (सामोआ) – विरूद्ध वानुआतु, 2024
  • मनन बशीर (बल्गेरिया) – विरुद्ध जिब्राल्टर, 2025
  • कुशल भुरटेल (नेपाळ) – विरुद्ध चीन, 2026

नेपाळ संघाचा विक्रम

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळने मोठा विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम मोडणं खूपच कठीण आहे. या सामन्यात 300पेक्षा जास्त धावा करण्याची नेपाळ संघाची दुसरी वेळ होती. या धावसंख्येसह नेपाळने इतिहासही रचला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोनदा 300 पेक्षा जास्त धावा करणारा हा जगातील पहिला संघ ठरला आहे.

Follow Us