Cricket Video : चायना स्टंप असतील तर असंच होणार! क्रिक्रेट मॅचमधील तो व्हिडीओ तुफान व्हायरल, चेंडू स्टंपला लागला तरी…

Cricket Viral Video : सध्या सोशल मीडियावर क्रिकेटच्या मैदानावरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुफान व्हायरल झालेल्या व्हिडिओत घडणारी घटना नेटकऱ्यांनी प्रचंड विनोदी शैलीत व्हायरल केली आहे.

Cricket Video : चायना स्टंप असतील तर असंच होणार! क्रिक्रेट मॅचमधील तो व्हिडीओ तुफान व्हायरल, चेंडू स्टंपला लागला तरी...
Cricket Viral video
Image Credit source: social media
| Updated on: Sep 20, 2026 | 5:31 PM

एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये क्रिकेटच्या मैदानावर रन आऊटचा थरार पाहायला मिळत आहे. यामध्ये फलंदाज विकेट वाचवण्यासाठी प्रचंड वेगात विकेटच्या दिशेने धावताना दिसत आहे. तिकडून फिल्डर त्याचा अचूक नेम लावून चेंडू विकेटच्या दिशेने भिरकावतो आणि पुढच्याच काही क्षणात असं काही घडतं की, सोशल मीडियावर नेटिझन्सला मोठा विषय मिळतो. नेमकं काय घडलं आहे? चला जाणून घेऊयात.

क्रिकेट हा क्रीडाप्रेमींसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. कदाचित हा एकमेव खेळ असेल जो जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. आता क्रिकेटच्या अनेक स्पर्धांचं नियोजन जगभरात केलं जातं. आयपीएल किंवा डब्ल्यूपीएल या भारतातल्या प्रचंड गाजलेल्या स्पर्धा आहेत. या स्पर्धांच्या सामन्यांमध्ये अनेकदा अशा घटना घडता,. ज्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात.जे कधी दोन खेळाडूंमध्ये घडतात तर कधी दोन संघांमध्ये तर कधी मैदानाव कोणतातही प्राणी किंवा पक्षी येऊन धुमाकूळ घालतात. त्यातील काही किस्से सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. अशावेळी रोमांचक आणि हास्यास्पद अशा दोन्ही स्वरुपाच्या रिअऍक्शन्स मैदानावरील फॅन्सच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात.

याच घटनांचे चित्रिकरण कालांतराने कोणीतरी सोशल मीडियावर शेअर करतो आणि त्याला मग अख्खं जग डोक्यावर घेतं. त्याला इतकी प्रसिद्धी मिळते की त्यावर नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देतात आणि मग मोठ्या प्रमाणावर ते व्हिडिओ किंवा फोटो स्प्रेड होतात.

 

 

असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ‘चायना स्टंप असतील तर असंच होणार!’ असं कॅप्शन लिहलेला हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये चेंडूच्या वेगानेच पीचवरील स्टंपच्या कडा लाल होऊन पडलेली दिसते. चेंडू आधी निघून जातो आणि त्यानंतर विकेट पडते. त्यामुळे हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. “when the wickets are made in China, this is what happens”, असं कॅप्शन दिलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रचंड तोंडसुख घेतलं आहे. “if wickets made in China would have been beoken”, Bails nahi dislodge hua not out, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. हा व्हिडिओ नेमका कोणत्या सीरिजमधला आहे हे कळू शकलेलं नाही, पण अंपायरने फलंदाजाला नॉटआऊट दिलेलं दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us