AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs PBKS : पंजाब किंग्सचा सलग दुसरा विजय, चेन्नईचा घरच्या मैदानात 5 विकेट्सने धुव्वा

IPL 2026 Chennai Super Kings vs Punjab Kings Match Result : पंजाब किंग्सचा चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममधील हा सलग चौथा विजय ठरला. कॅप्टन श्रेयस अय्यर याने पंजाबच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.

CSK vs PBKS : पंजाब किंग्सचा सलग दुसरा विजय, चेन्नईचा घरच्या मैदानात 5 विकेट्सने धुव्वा
Shreyas Iyer CSK vs PBKSImage Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 04, 2026 | 6:37 AM
Share

पंजाब किंग्स टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात (IPL 2026) सलग दुसरा विजय मिळवला आहे. पंजाबने होम टीम चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानात 5 विकेट्सने लोळवलं. चेन्नईने पंजाबसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 8 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. पंजाबने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून विजयी आव्हान गाठलं. पंजाबसाठी पहिल्या 6 फलंदाजांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र कॅप्टन श्रेयस अय्यर आणि ओपनर प्रभसिमरन सिंह या दोघांनी पंजाबच्या विजयात बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं. तसेच इतरांनीही हातभार लावला.

सीएसकेची बॅटिंग, पंजाब विरुद्ध 209 धावा

पंजाबने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 209 धावांपर्यंत मजल मारली.  युवा फलंदाज आयुष म्हात्रे याने चेन्नईसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर सर्फराज खान, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड या त्रिकुटानेही विस्फोटक खेळी केली.

संजू सॅमसन पुन्हा फ्लॉप

संजू सॅमसन 7 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 22 चेंडूत 28 धावा केल्या. आयुष म्हात्रे याने 43 बॉलमध्ये 73 रन्स केल्या. आयुषने या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार खेचले. ऑलराउंडर शिवम दुबे याने 27 बॉल 45 रन्स केल्या. तर सर्फराजने 12 बॉल 32 रन्स केल्या. पंजाबसाठी विजयकुमार वैशाख याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट फलंदाजाला बाद केलं.

पंजाब किंग्सचा सलग दुसरा विजय

प्रत्युत्तरात पंजाबने 210 धावांचं आव्हान एकतर्फी फरकाने पूर्ण केलं. पंजाबसाठी ओपनर प्रियांश आर्या याने 11 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. प्रियांशने या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार लगावले. प्रियांशचा साथीदार प्रभसिमरन सिंह याने 34 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 43 धावा केल्या. प्रियांश आणि प्रभसिमरन या सलामी जोडीने 61 धावांची भागीदारी केली.

कूपर कोनोलीने 36 धावा जोडल्या. कॅप्टन श्रेयस अय्यर याने अर्धशतक झळकावलं. श्रेयसने 29 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्ससह 50 रन्स केल्या. तर शशांक सिंह याने 14 आणि मार्कस स्टोयनिस याने 9 रन्स करत पंजाबला 5 विकेट्सने विजयी केलं. पंजाबचा हा सलग आण एकूण दुसरा विजय ठरला. पंजाबने याआधी 31 मार्च रोजी गुजरात टायटन्सवर 3 विकेट्सने मात केली होती.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा