AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs PBKS, Match Prediction : चेन्नईच्या डोक्यावर पराजयाची हॅट्रीक?, पंजाबला विजयाची प्रतीक्षा

आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा संघ आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये चांगली कामगिरी नाही करू शकला. आता कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात आज पंजाब विरुद्ध खेळणारा हा संघ कशी कामगिरी करणार, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून आहे.

CSK vs PBKS, Match Prediction : चेन्नईच्या डोक्यावर पराजयाची हॅट्रीक?, पंजाबला विजयाची प्रतीक्षा
आज पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामनाImage Credit source: tv9
| Updated on: Apr 03, 2022 | 11:21 AM
Share

मुंबई : आज चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यातील सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा संघ आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये चांगली कामगिरी नाही करू शकला. आता कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात आज पंजाब विरुद्ध खेळणारा हा संघ कशी कामगिरी करणार, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून आहे. चेन्नई सुपर किंग्स सुरुवातीलाच कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाला होता.  कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला सहा विकेट राखून सहज पराभूत केलं होतं. एमएस धोनीने (MS dhoni) या सामन्यात चमकदार खेळ दाखवला होता. पण, त्याचा उपयोग झाला नाही. तर दुसरीकडे पंजाब संघाचं बोलायचं झाल्यास पंजाब किंग्जनं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पराभव करत आयपीएल 2022ची दमदार सुरूवात केली आहे. पंजाबनं पहिल्या मॅचमध्ये 206 रनचं मोठं टार्गेट सहज पूर्ण केलं. त्या मॅचमध्ये पंजाबच्या बॅटर्सनी दमदार बॅटींग केली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्ससोबत झालेल्या सामन्यात आंद्रे रसेलच्या तुफानी फलंदाजीसमोर पंजाबला झुकावं लागलं होतं. उमेश यादवने चार विकेट्स घेत पंजाबला 137 धावांवर रोखले होतं.आता पंजाब आणि चेन्नई, हे दोन्ही संघ काय कामगिरी करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

सीएसकेला अधिक लक्ष द्यावं लागेल

आता पंजाबला रोखण्यासाठी सीएसकेला कसून गोलंदाजी करावी लागणार आहे. तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांनी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गोलंदाजी करताना संघर्ष केला होता. मात्र, त्यांना पंजाबविरुद्ध अधिक चांगलं खेळावं लागणार आहे. ब्राव्होने संघासाठी अपवादात्मकरित्या कामगिरी केली आहे. मात्र, त्याला इतरांच्या पाठिंब्याची आज गरज असणार आहे. तर जडेजालाही संघाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सलामीच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर लखनऊ विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सीएसकेची फलंदाजी चांगली होती. रॉबिन उथप्पा, अली आणि दुबे यांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांनी अशाच प्रकारे आजही तशीच कामगिरी दाखवायला हवी.

ऋतुराजवर दबाव असणार

आता पंजाब किंग्स या संघाविषयी बोलायचं झाल्यास ऋतुराज गायकवाडने चांगली कामगिरी केलीय. त्यामुळे त्याला आणि महेंद्रसिंग धोनीला आणखी चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. या दोघांकडे विशेष लक्ष असणार आहे. तर मयंक अग्रवाल, शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांच्या आघाडीच्या फळीत पंजाबला सीएसकेच्या आक्रमणावर सहज वर्चस्व मिळू शकतं.ओडियन स्मिथ आणि शाहरुख खान हे देखील बॉल डिलिव्हर करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांचाही हातभार संघाच्या विजयासाठी मोलाचा ठरेल.

इतर बातम्या

…अखेर गळाला लागलाच! मासे पकडण्यासाठी काय अफलातून युक्ती केलीय चिमुरड्यानं! ‘हा’ Jugaad video पाहाच

Supriya Sule| एका नोटिशीनं एढं भाषण बदलेल हे माहीत नव्हतं, सुप्रिया सुळे यांची राज ठाकरेंवर खोचक टीका

Chaitra Navratri : 51 शक्तीपीठांपैकी एक हिंगलाज शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये, ‘नानी का हज’ म्हणून प्रसिद्ध!

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.