DC vs SRH Live Score, IPL 2021 : दिल्लीचा हैद्राबादवर दणकेबाद विजय, 8 विकेट्सने सामना घातला खिशात

DCvs SRH Live Score in Marathi: आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असणाऱ्या हैद्राबाद संघाशी भिडणार आहे.

DC vs SRH Live Score, IPL 2021 : दिल्लीचा हैद्राबादवर दणकेबाद विजय, 8 विकेट्सने सामना घातला खिशात
सनरायजर्स हैद्राबाद

सनरायजर्स हैद्राबाद (SRH) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडलेल्या सामन्यात दिल्लीने अप्रतिम असा 8 विकेट्सने विजय मिळवला. सामन्यात नाणेफेक जिंकत हैद्राबादने फलंदाजी निवडली. पण त्यांच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने केवळ 134 धावांच हैद्राबादचा संघ करु शकला. ज्यामुळे 135 अशा सोप्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला. ज्यानंतर केवळ दोन गडी गमावत दिल्लीने विजय खिशात घातला. यावेळी दिल्लीकडून शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvu Shaw) यांनी चांगली सुरुवात केली. पण 11 धावा करुन शॉ बाद झाला तरी शिखरने मात्र धडाकेबाज फलंजाजी सुरुच ठेवली. त्याने 37 चेंडूत 6 षटकार आणि एक चौकार ठोकत 42 धावा केल्या. ज्यानंतर उर्वरीत जबाबदारी कर्णधार ऋषभ पंत (नाबाद 35) आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद 47) यांनी पार पाडत संघाला 8 विकेट्सनी दमदार विजय मिळवून दिला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 22 Sep 2021 22:58 PM (IST)

  DC vs SRH : दिल्लीचा 8 विकेट्सने विजय

  सुरुवातीला उत्तम गोलंदाजी करत हैद्राबादला अवघ्या 134 धावांवर रोखल्यानंतर दिल्ली संघाने उत्कृष्ट फलंदाजी करत केवळ दोन विकेटच्या बदल्यात सामना जिंकला आहे.

 • 22 Sep 2021 22:45 PM (IST)

  दिल्लीचं शतक

  img

  16 व्या षटकात ऋषभ पंतने षटकार ठोकत दिल्लीचं शतक पूर्ण केलं आहे. (दिल्ली 106/2)

 • 22 Sep 2021 22:25 PM (IST)

  दिल्लीला दुसरा झटका, शिखर धवन 42 धावांवर बाद

  img

  दिल्लीने शिखर धवनच्या रुपात दुसरी विकेट गमावली आहे. राशिद खानने त्याला अब्दुल समदकरवी झेलबाद केलं. धवनने 42 धावांची खेळी केली. (दिल्ली 72/2)

 • 22 Sep 2021 22:07 PM (IST)

  दिल्लीचं अर्धशतक

  पृथ्वी शॉ लवकर बाद झाल्यानंतर शिखर धवन (32) आणि श्रेयस अय्यर (08) या दोघांनी सावधपणे आगेकूच केली आहे. त्यामुळे दिल्लीने 8 षटकात 51 धावांपर्यंत मजल मारली आहे.

 • 22 Sep 2021 21:42 PM (IST)

  DC vs SRH : विल्यमसनची सुपर कॅच, शॉ बाद

  img

  हैद्राबादचा कर्णधार केन विल्यमसनने खलील अहमदच्या चेंडूवर पृथ्वी शॉचा अप्रतिम झेल पकडत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. 20 धावांवर दिल्लीचा पहिला गडी बाद झाला आहे.

 • 22 Sep 2021 21:30 PM (IST)

  DC vs SRH : दिल्लीच्या फलंदाजीला सुरुवात

  135 धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीने फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला आल आहेत.

 • 22 Sep 2021 21:14 PM (IST)

  DC vs SRH : हैद्राबादची 134 धावांंपर्यंत मजल

  अखेरच्या षटकात दोन रनआऊट झाल्यामुळे हैद्राबादचा संघ 140 धावांचा आकडा पार करु शकला नाही. ज्यामुळे ते केवळ 134 धावांपर्यंत मजल मारु शकले आहेत. आता दिल्लीला विजयासाठी केवळ 135 धावांची गरज आहे.

 • 22 Sep 2021 21:10 PM (IST)

  DC vs SRH : राशिद खान धावचीत

  img

  अखेरच्या षटकात 22 धावा करुन राशिद खान धावचीत झाला आहे.

 • 22 Sep 2021 21:04 PM (IST)

  DC vs SRH : अब्दुल समद बाद

  img

  हैद्राबाद संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल समदला बाद करण्यात कागिसो रबाडाला यश आलं आहे. रबाडाच्या चेंडूवर ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला आहे.

 • 22 Sep 2021 20:48 PM (IST)

  DC vs SRH : पृथ्वीने टिपला होल्डरचा झेल

  img

  हैद्राबाद संघाचा सहावा विकेट अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरच्या रुपात गेला आहे. अक्षरच्या चेंडूवर पृथ्वीने त्याचा झेल टिपला आहे.

 • 22 Sep 2021 20:36 PM (IST)

  DC vs SRH : नॉर्खियाला आणखी एक यश, जाधवही बाद

  img

  हैद्राबाद संघाचा आणखी एक विकेट केदार जाधवच्या रुपात पडला आहे. ए. नॉर्खियाने त्याला पायचीत केलं आहे.

 • 22 Sep 2021 20:25 PM (IST)

  DC vs SRH : मनिष पांडेही बाद

  img

  केन बाद होताच पुढच्याच ओव्हरमध्ये मनिष पांडेही बाद झाला आहे. कागिसो रबाडाने त्याच्याच चेंडूवर स्वत:च झेल घेत पांडेला तंबूत धाडलंं.

 • 22 Sep 2021 20:20 PM (IST)

  DC vs SRH : दोन जीवदानानंतर केन झेलबाद

  img

  हैद्राबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसनला दोन जीवदान मिळाल्यानंतर तिसऱ्या वेळी मात्र तो बाद झाला आहे. एकदा पंतने आणि एकदा पृथ्वीने केनचा झेल सोडल्यानंतर अखेर हीटमायरने अक्षरच्या चेंडूवर केनचा झेल पकडला.

 • 22 Sep 2021 20:15 PM (IST)

  DC vs SRH : आश्विनला पहिल्याच चेंडूवर चौकार

  img

  मागील काही काळापासून मैदानापासून दूर असलेला आश्विन दिल्लीकडून सामना खेळत आहे. पण त्याला पहिल्याच चेंडूवर विल्यमसनने चौकार मारला आहे.

 • 22 Sep 2021 19:54 PM (IST)

  DC vs SRH : वृद्धीमान साहाही आऊट!

  img

  पहिल्याच षटकात वॉर्नर बाद झाल्यानंतर हैद्राबादचा डाव सावरणारा वृद्धिमान साहाही बाद झाला आहे. रबाडाच्या चेंडूवर गब्बर शिखर धवनने त्याचा झेल घेतला आहे.

 • 22 Sep 2021 19:34 PM (IST)

  DC vs SRH : डेव्हिड वॉर्नर शून्यावर बाद

  img

  सामना सुरु होताच सनरायजर्स हैद्राबादला मोठा झटका बसला आहे. त्यांचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर शून्यावर बाद झाला आहे. नॉर्खियाच्या चेंडूवर अक्षर पटेलने त्याचा झेल घेतला.

 • 22 Sep 2021 19:08 PM (IST)

  DC vs SRH : दिल्ली संघाचे अंतिम 11

  पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), मार्कस स्टयनिस, शिमरॉन हिटमायर, अक्षर पटेल, आर आश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, ए. नॉर्खिया

 • 22 Sep 2021 19:07 PM (IST)

  DC vs SRH : हैद्राबाद संघाचे अंतिम 11

  डेव्हिड वॉर्नर, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मनिष पांडे, केन विल्यमसन (कर्णधार), केदार जाधव, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा

 • 22 Sep 2021 19:06 PM (IST)

  DC vs SRH : हैद्राबादने निवडली फलंदाजी

  सामन्याला काही वेळातच सुरुवात होणार आहे. सनरायजर्स हैद्राबादने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे.

 • 22 Sep 2021 19:03 PM (IST)

  सामन्यावर कोरोनाचं सावट

  कोरोना महामारीने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये शिरकाव केला आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघाचा खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यावरही रद्द होण्य़ाचे सावट होते. पण टी नटराजन कोरोनाबाधित आढळताच त्याच्यासह हैद्राबाद संघातील सहा सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात
  आलं आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं असून आज होणाऱ्या SRH vs DC सामन्यावर मात्र कोणतं संकट नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI