W,W,W..! टीएनपीएल टी20 लीग स्पर्धेत ‘गोल्डन हॅटट्रीक’, के डीबन लिंगेशच्या नावावर विक्रमाची नोंद Video

तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. पहिल्या षटकात एकही धाव न देता तीन विकेट काढल्या. यासह टीएनपीएल इतिहासात गोल्डन हॅटट्रीक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

W,W,W..! टीएनपीएल टी20 लीग स्पर्धेत गोल्डन हॅटट्रीक, के डीबन लिंगेशच्या नावावर विक्रमाची नोंद Video
W,W,W..! टीएनपीएल टी20 लीग स्पर्धेत 'गोल्डन हॅटट्रीक', के डीबन लिंगेशच्या नावावर विक्रमाची नोंद Video
Image Credit source: TNPL
| Updated on: Aug 27, 2026 | 4:32 PM

तामिळनाडू प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत क्वॉलिफायर 2 सान्यात विदा कोवई किंग्स आणि त्रिची ग्रँड चोलास हे संघ आमनेसामने आले होते. 26 ऑगस्ट 2026 रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात विदा कोवाई किंग्सने 84 धावांनी विजय मिळवला. विदा कोवाई किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 183 धावा केल्या. तर त्रिची ग्रँड चोलासचा सघ 15.4 षटकात अवघ्या 99 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात पहिल्याच षटकात विदा कोवाई किंग्सच्या डीबन लिंगेशने दाणादाण उडवून दिली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे त्रिची ग्रँड चोलास संघ बॅकफूटवर गेला. मध्यमगती गोलंदाज के. डीबन लिंगेश याने एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डावाच्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या 3 चेंडूंवर सलग 3 विकेट्स काढल्या आणि गोल्डन हॅटट्रीक नावावर केली. टी20 क्रिकेटच्या इतिहासात डावाच्या पहिल्या तीन चेंडूंवर हॅटट्रिक घेण्याची दुर्मिळ घटना आहे.

विदा कोवाई किंग्सने विजयासाठी दिलेल्या 184 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पहिल्या तीन खेळाडूंना खातंही खोलता आलं नाही. के डीबन लिंगेशचा पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी के राजकुमार स्ट्राईकला आला होता. त्याला पहिल्याच चेंडूवर झेल बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसर्‍या चेंडूवर एस श्याम सुंदरला झेल बाद केलं आणि सलग दुसरी विकेट घेतली. त्यानंतर जगदीशन कौशिकला क्लीन बोल्ड केलं आणि हॅटट्रीक घेतली. विशेष म्हणजे त्याने पहिल्या षटकात एकही धाव दिली नाही आणि निर्धाव षटक टाकलं. यासह टीएनपीएलध्ये पहिली गोल्डन हॅटट्रीक घेणारा गोलंदाज ठरला आहे.

के डीबन लिंगेशने या हंगामात आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये तब्बल 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी 11.86 इतकी असून प्रत्येक 12 धावांमागे एक विकेट असं गणित आहे. लिंगेश हा प्रामुख्याने मध्यमगती गोलंदाज असला तरी खालच्या फळीत येऊन फलंदाजी देखील करू शकतो. त्याच्या या कामगिरीमुळे आयपीएल स्पर्धेची दारं खुली होणार आहे.

तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आता विदा कोवई किंग्स आणि सीचेम मदुराई पँथर्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 28 ऑगस्टला चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. क्वालिफायर-1 सामना पावसामुळे झाला नाही. त्यामुळे लीग पॉइंट टेबलमदील चांगल्या स्थानामुळे मदुराई पँथर्सला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.

Follow Us