दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभचा वाढदिवस, केकने रंगवलं पंतचं तोंड, पाहा PHOTOS

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने सोमवारी त्याचा 24 वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे त्याने दिल्लीचा कर्णधाराची भूमिका पार पाडत चेन्नई सुपरकिंग्सला 3 विकेट्सनी मात देखील दिली.

1/5
यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाने दमदार कामगिरी केली आहे. सुरुवातीपासून सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करत आता अव्वल स्थानीच्या चेन्नई (CSK) संघाला नमवत पहिलं स्थानही गाठलं आहे. दरम्यान दिल्लीच्या या कामगिरीचा शिल्पकार कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने सोमवारी (4 ऑक्टोबर) त्याचा 24 वा वाढदिवस साजरा केला.

2/5
ऋषभने वाढदिवसादिवशी संघाला चेन्नईवर विजय मिळवून देत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. यानंतर संघाच्या विजयासह त्याच्या वाढदिवसाचं निमित्त म्हणून हॉटेलमध्ये सर्व दिल्लीच्या खेळाडूंनी दमदार सेलिब्रेशन केलं.

3/5
यावेळी वाढदिवस साजरा करताना अगदी लहान मुलांप्रमाणे सर्वांनी ऋषभला केकने भरवलं. पंतच्या सर्व चेहऱ्यासह त्याच्या अंगावर केक लागला होता. त्याने त्याच्या सोशल मीडियावर हे सर्व फोटो पोस्ट केले आहेत.

4/5
या फोटोंंमध्ये पंत सर्व खेळाडूंबरोबर मजा-मस्ती करत असून वरील फोटोत दिग्गज क्रिकेटर आर आश्विन हाही केकेने भरलेला दिसून येत आहे.

5/5
दरम्यान कर्णधाराच्या वाढदिवसादिवशी दिल्लीने चेन्नई संघावर 3 विकेट्सने विजय मिळवला.  चेन्नईचा संघाने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 137 धावांचे आव्हान ठेवले जे 3 गडी राखून दिल्लीने पूर्ण करत विजय मिळवला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI