पाकिस्तानची इंग्लंडमध्ये नाचक्की, कसोटी मालिकेत क्लिन स्विप; तिसऱ्या सामन्याचा चार दिवसात निकाल

बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानला 8 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह इंग्लंडने पाकिस्तानला 3-0 ने व्हाईटवॉश देऊन कसोटी क्रिकेटमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पण दुर्दैवाने दोन्ही संघांचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

पाकिस्तानची इंग्लंडमध्ये नाचक्की, कसोटी मालिकेत क्लिन स्विप; तिसऱ्या सामन्याचा चार दिवसात निकाल
पाकिस्तानची इंग्लंडमध्ये नाचक्की, कसोटी मालिकेत क्लिन स्विप; तिसऱ्या सामन्याचा चार दिवसात निकाल
Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Sep 12, 2026 | 5:57 PM

बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची ही कसोटी मालिका 3-0 ने खिशात घातली. अर्थात पाकिस्तानला कसोटी मालिकेत क्लिन स्विप दिला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने कमबॅक करण्याची धडपड केली होती. पण ही धडपड क्षुल्लक होती. सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करत पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या 133 धावांवर गुंडाळला. पाकिस्तानकडून सौद शकीलने सर्वाधिक 43 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात भक्कम सुरुवात केली होती.

दुसऱ्या दिवशी काय घडलं?

दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हॅरी ब्रूक 75 धावा, डॅन लॉरेन्स 65 आणि जेमी स्मिथ 69 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 453 धावांचा हिमालय उभा केला. यादरम्यान काही काळ पावसाचा व्यत्यय आला, तरीही इंग्लंडने पहिल्या डावात 320 धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावाची सुरुवात करताना पाकिस्तानची 2 बाद 0 अशी बिकट अवस्था झाली होती.

तिसऱ्या दिवशी असा खेळ झाला

दुसऱ्या डावात खेळतान तिसऱ्या दिवशी शान मसूद 95 आणि कर्णधार बाबर आझमच्या 76 धावांच्या खेळीमुळे संघाचा डाव सावरला. पण 21 वर्षांचा नवोदित खेळाडू रझाउल्लाह खान याने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने अवघ्या 63 चेंडूत 9 षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद अब्बाससोबत नवव्या गड्यासाठी 121 धावांची विक्रमी भागीदारी रचली. या चिवट लढ्यामुळे पाकिस्तानने दुसऱ्या डावात 449 धावा केल्या आणि डावाने पराभव टाळून इंग्लंडसमोर विजयासाठी 130 धावांचे आव्हान ठेवले.

चौथ्या दिवशी इंग्लंडचं वर्चस्व

चौथ्या दिवशी 130 धावांच्या छोट्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात काहीशी अडखळती झाली. परंतु, अनुभवी जो रूट 62) आणि जॉर्डन कॉक्स 59 यांनी शतकी भागीदारी रचत इंग्लंडला 2 गडी गमवून विजयी धावा गाठून दिल्या. यासह पाकिस्तानला 8 गडी राखून पराभूत केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us