टीम इंडियाची ही सर्वात मोठी चूक, म्हणूनच होतोय पराभव, आर आश्विनने सगळं बाहेर काढलं!

रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे भाग्यवान होते. कारण त्यांच्यासोबत संघामध्ये बुमराह होता. भारताकडे चांगले गोलंदाज फार कमी आहेत. भारतीय गोलंदाजी विभागाच्या भविष्याबाबत मला चिंता लागलेली आहे, असं आर आश्विन म्हणाला.

टीम इंडियाची ही सर्वात मोठी चूक, म्हणूनच होतोय पराभव, आर आश्विनने सगळं बाहेर काढलं!
team india and indian bowler
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 8:07 PM

R Ashwin On Team India Defeat : भारतात क्रिकेटचे कोट्यवधी लोक दिवाने आहेत. भारतीय संघाचा सामना असला तर लोक काम सोडून सामना बघत बसतात. भारताचा वेस्टि इंडिजसोबत नुकताच दुसरा टी-20 सामना झाला. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने दिलेले 250 धावांचे लक्ष्य भारताला गाठता आलेले नाही. दरम्यान, या पराभवानंतर भारताची नेमकी चूक काय झाली? भारताचे फलंदाज, गोलंदाज कुठेतरी कमी पडत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान, आता भारतापुढे नेमके आव्हान काय आहे? याबाबत कधीकाळी भारताचा टॉपचा फिरकीपटू असलेला आर. अश्विन याने महत्त्वाचं भाष्य केलंय. त्याने भारतीय संघ कुठे चूक करतोय, याची माहिती दिलीय.

आर आश्विनने भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी विभागात नेमक्या काय कमतरता आहेत, याबाबत त्यांच मत व्यक्त केलंय. आपल्याला चांगले गोलंदाज हवे असतील तर जास्त मेहनत घेणं गरजेचं आहे. एखादे मैदान जास्त धावा करण्यास अनुकूल असेल तर अशा वेळी वेगवान गोलंदाज बुमहार या एकट्यावर अवलंबून राहणे चुकीचे आहे, असं परखड मत आश्विनने व्यक्त केलंय. आश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड केलाय. याच व्हिडीओत त्याने वरील मत व्यक्त केलंय.

Loading...

सोबतच भारताकडे चांगले गोलंदाज नाहीत, असं माझं मत नाहीये. परंतु आपल्या गोलंदाजांकडे गरजेचे असलेले कौशल्य नाहीये. चांगले गोलंदाज घडवण्याकडे आपण लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच चांगले गोलंदाज घडत नाहीयेत, असं म्हणत त्याने भारतीय क्रिकेट संघाच्या चुकीवर बोट ठेवलं.

रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे भाग्यवान होते. कारण त्यांच्यासोबत संघामध्ये बुमराह होता. भारताकडे चांगले गोलंदाज फार कमी आहेत. भारतीय गोलंदाजी विभागाच्या भविष्याबाबत मला चिंता लागलेली आहे, असंही तो म्हणाला.

दरम्यान, आश्विनने दाखवलेली ही चूक भारतीय संघ दुरुस्त करणार का? आगामी सामन्यांत भारत काही वेगळी स्ट्रॅटेजी आखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us