GT vs CSK Live Streaming : गुजरातसाठी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर महत्त्वाचा सामना, चेन्नई जिंकणार?

Gujarat Titans vs Chennai Super Kings IPL 2026 Live Scorecard : क्रिकेट चाहत्यांना गुरुवारी 21 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.जाणून घ्या.

GT vs CSK Live Streaming : गुजरातसाठी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर महत्त्वाचा सामना, चेन्नई जिंकणार?
GT vs CSK IPL 2026
Image Credit source: Bcci
| Updated on: May 20, 2026 | 11:56 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 66 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील 14 वा आणि शेवटचा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. गुजरातने प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. मात्र त्यानंतरही गुजरातसाठी हा सामना टॉप 2 च्या हिशोबाने निर्णायक असणार आहे. तर चेन्नईला प्लेऑफमधील जर तरचं आव्हान राखण्यासाठी विजयी होणं बंधनकारक आहे. त्यामुळे चेन्नई जिंकणार की गुजरात आणखी 2 गुण मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us