दीप्ती शर्मावर आगपाखड करणाऱ्यांना Harsha bhogle यांचं सडेतोड प्रत्युत्तर

| Updated on: Sep 30, 2022 | 6:31 PM

हर्षा भोगले यांच्याकडून इंग्लंडच्या मानसिकतेची पोल-खोल. थेट म्हटलं....

दीप्ती शर्मावर आगपाखड करणाऱ्यांना Harsha bhogle यांचं सडेतोड प्रत्युत्तर
नेमकं काय केलं? जाणून घ्या
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई: मागच्या आठवड्यात भारत-इंग्लंड वनडे सामन्यात दिप्ती शर्माने चार्ली डीनला रनआऊट केलं. दीप्तीने ज्या पद्धतीने चार्लीला रनआऊट केलं, ते इंग्लिश मीडिया आणि खेळाडूंना पचवता आलेलं नाही. क्रिकेटच्या नियमानुसार दिप्तीने चार्लीला बाद केलं. पण इंग्लिश मीडियाचा एका मोठा वर्ग दिप्तीला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न करतोय.

सडेतोड प्रत्युत्तर दिलं

खरंतर चूक यामध्ये चार्ली डीनची होती. कारण दिप्तीने चेंडू टाकण्याआधीच चार्लीने क्रीज सोडला होता. पण इंग्लिश क्रिकेटपटू उलट-सुलट विधान करतायत. दिप्तीलाच चुकीच ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इंग्लिश मीडिया आणि खेळाडूंना प्रसिद्ध कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक टि्वट करुन इंग्लंडच्या मानसिकतेची पोल-खोल केली.

दुसरी मुलगी नियमाबाहेर जात होती

हर्षा भोगले यांनी दिप्ती शर्माच्या समर्थनार्थ टि्वट केलय. “मी हैराण आहे. एक मुलगी नियमातंर्गत खेळत होती, तरी इंग्लिश मीडिया तिलाच प्रश्न विचारतोय. दुसरी मुलगी नियमाबाहेर जात होती. सतत चूका करत होती” असं हर्षा भोगले यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलय.

अशी मानसिकता अजूनही इंग्लंडमध्ये आहे

“ही सांस्कृतिक गोष्ट आहे. इंग्लंडने क्रिकेटच्या एका मोठ्या भागावर राज्य केलय. त्यामुळे इंग्लिश क्रिकेटपटूंना असं वाटतं की, असं करणं चुकीच होतं. अशी मानसिकता अजूनही इंग्लंडमध्ये आहे” असं हर्षा भोगले यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलय.

“खेळ नियमानुसार खेळणं ही सर्वात सोपी गोष्ट आहे. खेळ भावनेच्या व्याख्येबद्दल चिंता करणं त्यांनी बंद करावं. दुसऱ्यांवर आपलं मत लादू नका. नॉनस्ट्रायकरने क्रीजच्या मागे असावं असं नियम सांगतो” असं हर्षा भोगले यांनी टि्वटमध्ये म्हटलय.