AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 तास 32 मिनिटांचा क्राइम थ्रिलर OTT वर तुफान ट्रेंड; जबरदस्त ट्विस्ट अन् क्लामॅक्स तर..

ओटीटीवर सध्या असा एक चित्रपट चर्चेत आला आहे, जो 2021 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या क्राइम थ्रिलर चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी आहे. जियो हॉटस्टारवर हा चित्रपट स्ट्रीम होतोय.

2 तास 32 मिनिटांचा क्राइम थ्रिलर OTT वर तुफान ट्रेंड; जबरदस्त ट्विस्ट अन् क्लामॅक्स तर..
हॉटस्टारवर ट्रेंड होतोय हा चित्रपटImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 25, 2026 | 3:46 PM
Share

विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला नवनवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येतो. रोमँटिक, क्राइम, सस्पेन्स थ्रिलर, रोमँटिक कॉमेडी, कॉमेडी अशा विविध जॉनरचे चित्रपट आणि वेब सीरिज या प्लॅटफॉर्म्सवर सहज उपलब्ध असतात. असाच एक क्राइम थ्रिलर चित्रपट सध्या ओटीटीवर ट्रेंड होतोय. या चित्रपटाची कथा इतकी दमदार आहे की, त्यावरून तुमची नजरच हटणार नाही. जर तुम्हाला सस्पेन्स आणि ब्लॅक कॉमेडी आवडत असेल, तर नक्कीच तुम्हाला हा चित्रपट आवडू शकतो. या चित्रपटाचं नाव आहे ‘भ्रमम’. जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या हा चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. ट्रेंडिंग लिस्टमध्ये हा चित्रपट पाचव्या स्थानी आहे आणि प्रेक्षक या क्राइम थ्रिलरला खूप पसंत करत आहेत.

‘भ्रमम’ हा चित्रपट ‘अंधाधुन’ या बॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत मल्याळम रिमेक आहे. 2018 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यामध्ये आयुषमान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे यांच्या भूमिका होत्या. जर तुम्ही ‘अंधाधुन’ पाहिला असेल तर हा मल्याळम रिमेक का पहावा, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर म्हणजे, ‘भ्रमम’मध्ये बरंच काही नवीन दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाची कथा रे मॅथ्युजच्या (पृथ्वीराज सुकुमारन) अवतीभवती फिरते, जो एक पियानोवादक असतो. जगासमोर तो आंधळं असल्याचं नाटक करतो, जेणेकरून लोकांनी त्याच्याकडे दयेच्या भावनेनं पहावं आणि त्याला संगीताच्या चांगल्या संधी मिळाव्यात.

कथेत पुढे रे मॅथ्युजची भेट अन्नाशी (राशी खन्ना) होते. अन्ना त्याला त्याच्या वडिलांच्या रेस्टॉरंटमध्ये पियानो वाजवण्यासाठी पाठवते. त्यानंतर तिथे त्याची भेट उदय कुमारशी होते, जो त्याला त्याच्या घरी पियानो वाजवण्यासाठी आमंत्रित करतो. जेव्हा तो त्याच्या घरी पोहोचतो, तेव्हा तिथे तो हत्येच्या घटनेचा साक्षीदार होतो आणि इथूनच कथेत मोठं वळण येतं.

भ्रमम या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, राशी खन्ना यांच्यासोबत उन्नी मुकुंदनने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्ट्रीम करण्यात आला होता. आता तो जियो हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Follow Us
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.