AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table: चेन्नईचा सलग दुसरा विजय, केकेआरची आणखी वाईट स्थिती, मुंबईला मोठा झटका

IPL 2026 Points Table: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या 2 चॅम्पियन्स संघातील सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे. चेन्नईच्या विजयामुळे मुंबईला फटका बसला आहे.

IPL 2026 Points Table: चेन्नईचा सलग दुसरा विजय, केकेआरची आणखी वाईट स्थिती, मुंबईला मोठा झटका
Mumbai Indians IPL 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 15, 2026 | 2:42 AM
Share

चेन्नई सुपर किंग्सची ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात आणि महेंद्रसिंह धोनी याच्या अनुपस्थितीत आयपीएल 2026 स्पर्धेत निराशाजनक सुरुवात झाली. आयपीएल स्पर्धेत एकूण 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नईला पहिल्या आणि सलग 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. मात्र त्यानंतर चेन्नईने दणक्यात कमबॅक करुन दाखवलं आहे. चेन्नईने दिल्ली कॅपिट्ल्सनंतर आता कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय साकारला आहे. ऋतुराज गायकवाड याच्या कॅप्टन्सीत यलो आर्मीने मंगळवारी 14 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केलं. चेन्नईचा हा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. तर केकेआरला चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईच्या सलग दुसऱ्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमधील लोअर ऑर्डरमध्ये बदल झाला आहे. चेन्नईने एका स्थानाने झेप घेतली आहे. केकेआरची आणखी वाईट स्थिती झाली आहे. तर मुंबईची घसरण झाली आहे. पॉइंट्स टेबलची स्थिती काय आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.

चेन्नईला विजयानंतर फायदा

चेन्नई केकेआर विरूद्धच्या विजयानंतर नवव्या स्थानावरुन आठव्या क्रमांकावर पोहचली आहे. तसेच चेन्नईच्या नेट रनरेटमध्ये बदल झाला आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा सामन्याआधी -1.532 असा होता. चेन्नईचा विजयानंतर नेट रनरेट -0.846 असा झाला आहे. चेन्नईच्या खात्यात आता 5 सामन्यानंतर 2 विजयासह 4 गुण झाले आहेत. मात्र चेन्नईला प्लेऑफच्या शर्यतीत कायम रहायचं असेल तर इथून असंच सातत्य ठेवावं लागेल. तर चेन्नई आठव्या स्थानी गेल्याने मुंबईला झटका लागला आहे.  मुंबईची आठव्या स्थानावरुन नवव्या स्थानी घसरण झाली आहे.

केकेआरचा फ्लॉप शो कायम, पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी

केकेआरने पाचव्या सामन्यातही निराशाजनक कामगिरी कायम ठेवली. केकेआरची यासह स्पर्धेच्या इतिहासात पाचव्या सामन्यानंतरही विजयी न होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. केकेआरला 5 पैकी 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. तर केकेआरचा पंजाब विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे केकेआरच्या खात्यात 1 गुण आहे. केकेआरचा नेट रनरेट हा -1.383 असा झाला आहे.

चेन्नईची सलग दुसऱ्या विजयासह आठव्या स्थानी उडी

इतर संघांची स्थिती काय?

राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानी विराजमान आहे. राजस्थानने 5 पैकी 4 सामने जिंकलेत. राजस्थानच्या खात्यात 8 गुण आहेत. पंजाब 7 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबी 6 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानी असलेल्या हैदराबादने 5 पैकी 2 सामने जिंकलेत. तर दिल्ली, गुजरात आणि लखनौने प्रत्येकी 2-2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Follow Us
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...