AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs KKR : केकेआरचा चौथा पराभव, चेन्नईकडून 32 धावांनी धुव्वा, यलो आर्मीचा सलग दुसरा विजय

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Match Result, IPL 2026 : अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स पुन्हा एकदा विजयाचं खातं उघडण्यात अपयशी ठरली आहे. चेन्नई सुपर किंग्सने घरच्या मैदानात केकेआरवर 32 धावांनी विजय साकारला आहे.

CSK vs KKR : केकेआरचा चौथा पराभव, चेन्नईकडून 32 धावांनी धुव्वा, यलो आर्मीचा सलग दुसरा विजय
CSK vs KKR IPL 2026 Match ResultImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 15, 2026 | 1:56 AM
Share

चेन्नई सुपर किंग्सने कॅप्टन ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात घरच्या मैदानात अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर 32 धावांनी मात केली आहे. चेन्नईने केकेआरसमोर 193 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. मात्र केकेआरला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईने अशाप्रकारे या 19 व्या मोसमातील आपला सलग आणि एकूण दुसरा सामना जिंकला आहे. चेन्नईचा हा घरच्या मैदानातील दुसरा विजय ठरला. तसेच चेन्नई 2024 नंतर यंदा पहिल्यांदाच सलग दुसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. तर केकेआरचा हा या मोसमातील पाचव्या सामन्यातील चौथा पराभव ठरला.

टॉस गमावून बॅटिंगला आलेल्या चेन्नईने 5 विकेट्स गमावून 192 रन्स केल्या. चेन्नईसाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक धावा जोडल्या. संजूने 32 बॉलमध्ये 48 रन्स केल्या. ऋतुराज गायकवाड 7 रन्स करुन आऊट झाला. डेवाल्ड ब्रेव्हीस याने 41 धावा केल्या. आयुष म्हात्रे याने 17 बॉलमध्ये वेगवान 38 रन्स ठोकल्या. सर्फराज खान याने 23 धावांचं योगदान दिलं. तर शिवम दुबे 13* आणि जेमी ओव्हरटन याने 7* रन्स केल्या. केकेआरकडून कार्तिक त्यागी याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. वैभव अरोरा, अनुकूल रॉय आणि सुनील नारायण या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

केकेआरची बॅटिंग

केकेआरचे टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांपैकी एकालाही 30 आकडा गाठता आला नाही. फिन एलन याने 1 धाव केली. सुनील नारायण, कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी या तिघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र या तिघांपैकी एकालाही या खेळीला मोठ्या आकड्यात बदलता आलं नाही. अजिंक्यने 28, अंगकृषने 27 आणि नारायणने 24 रन्स केल्या. उपकर्णधार रिंकु सिंह याने 6 धावा केल्या. कॅमरुन ग्रीन पहिल्याच बॉलवर आला तसाच परत गेला.

स्कोअरकार्ड

तर अखेरच्या टप्प्यात रोव्हमॅन पॉवेल आणि रमनदीप सिंह या दोघांनी केकेआरला विजयी करण्यासाठी पूर्ण जोर लावला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. रमनदीप सिंह याने केकेआरसाठी सर्वाधिक 35 धावा केल्या. तर रोव्हमॅन पॉवेल याने नॉट आऊट 31 रन्स केल्या. चेन्नईकडून नूर अहमद याने 3 विकेट्स मिळवल्या. अंशुल कंबोज याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर खलील अहमद आणि अकील हौसेन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय