AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Election : रेणुका देवीच्या परडीवर हात ठेवून घ्यायला लावली शपथ, गोकुळ दूध संघाची निवडणूक वेगळ्या वळणावर

गोकुळ दूध संघाची निवडणूक वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. कोल्हापुरात महायुतीतच्या नेत्यांनी सभासदांना रेणुका देवीच्या परडीवर हात ठेवून शपथ घ्यायला लावली आहे.

Gokul Election : रेणुका देवीच्या परडीवर हात ठेवून घ्यायला लावली शपथ, गोकुळ दूध संघाची निवडणूक वेगळ्या वळणावर
hasan mushrifImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 11:18 AM
Share

कोल्हापूरच्या गोकूळ दूध महासंघाची निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. गोकूळ संघाच्या निवडणुकीसाठी  मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी कंबर कसली आहे. ही निवडणूक अंतिम टप्प्यावर आली असताना सभासदांना सहलीवर पाठवण्यात आलं आहे. नेत्याकडून आणि सभासदाकडून कोणताही दगाफटका होणार नाही, याची काळजी महायुतीच्या नेत्यांकडून घेतली जात आहेत. या निवडणुकीसाठी रेणुका देवीच्या परडीवर हात ठेवून शपथ घ्यायला लावली आहे.

निवडणूक वेगळ्या वळणार 

गोकूळ दूध संघाची निवडणूक वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. गोकूळ संघासाठी मतदान करणाऱ्या ठराव धारकांना महायुतीकडून शपथ दिली आहे. या गावच्या सौंदत्ती डोंगरावर रेणुका देवीच्या परडीवर हात ठेवून शपथ घ्यायला लावली. सौदत्ती डोंगरावरील स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमच्या तालुक्याचे अब्रू वाचवणं तुमच्याच हातात आहे. काहीही खेळ करू नका..आमची तुम्हाला शपथ आहे.  खोटं बोललं की देवी अंगावर उठते. ठराव धारकांना शपथ देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केलं. या ठराव धारकांना देवीची शपथ देताना भाजप खासदार धनंजय महाडिक माजी खासदार संजय मंडलिक देखील उपस्थित होते.

मुश्रीफ काय म्हणाले?

हसन मुश्रीफ यांचा एक व्हिडिओसमोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुश्रीफ म्हणत आहे की, माझ्यासह सर्वांना शपथ घ्यायची आहे. मी गद्दारी करणार नाही. खरंतर त्यासाठी दोन अडीच तास लागतील. कागलची अब्रू वाचवायची आहे. हे सर्व तुमच्या हातात आहे. तुम्हाला शपथ आहे. यल्लामा देवी किती जागृत असल्याचे म्हणत खोटं करेल तर अंगावर उठते’.

‘आमची कॉलर खाली होता कामा नये. ती ताठ राहिली पाहिजे. तुमच्यासोबत आम्ही देखील शपथ घेणार आहे.  निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान करायचं आहे. कपबशीला मतदान करणार आहे. आई यल्लामाची शपथ घेतो, असे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी शपथ घेताना म्हटलं. त्यांचाही व्हिडिओ व्हायरल होत आहे. तत्पूर्वी, शपथ घेतल्यानंतर  हसन मूश्रीफ यांनी जागृत देवस्थान रेणुका देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. कोल्हापूर जिल्हा सकारी उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून येऊ दे, असे त्यांनी रेणुकादेवीच्या चरणी साकडं घातलं.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय