Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर, 57 बनावट खाती उघडली?
भोंदू अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत असून, आर्थिक गैरव्यवहारांचे जाळे अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. महिलांचे कथित लैंगिक शोषण, व्यापारी व व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळणे तसेच राजकीय संपर्कांचा वापर करून लाभ मिळवणे असे गंभीर आरोप या प्रकरणात समोर आले आहेत.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने भाविक भक्तांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड गोळा करून त्यांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या ओळखपत्रांच्या आधारे समता पतसंस्थेत तब्बल 57 बनावट खाती उघडण्यात आल्याचे उघड झाले आहे. या खात्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, पॅन कार्डवरील स्वाक्षऱ्यांशी साधर्म्य राखून बनावट सह्या करून खाती उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 35 खात्यांची चौकशी पूर्ण केली असून, त्यापैकी सुमारे 90 टक्के स्वाक्षऱ्या संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे.
देवदर्शनाच्या नावाखाली नागरिकांची कागदपत्रे गोळा करून त्यांचा गैरवापर केल्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उर्वरित खातेदारांना चौकशीसाठी शिर्डी पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात येणार असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात