Ashok Kharat Case Update | शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहारांबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर चार खाती असल्याचे उघड झाले आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहारांबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर चार खाती असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या चारही खात्यांचा अशोक खरात हा नॉमिनी असल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांमधून सुमारे 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, प्रतिभा चाकणकर यांनी हे आरोप फेटाळत आपल्या नावाने बनावट खाती उघडण्यात आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची संयुक्तपणे 8 तास चौकशी केली. या चौकशीत त्यांच्या पैशांचा स्रोत काय आहे आणि अशोक खरात यांच्याशी त्यांचा आर्थिक व्यवहारांचा नेमका काय संबंध आहे, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या प्रकरणामुळे आर्थिक व्यवहार आणि बँक खात्यांच्या तपासात नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.
Published on: Apr 14, 2026 02:16 PM
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें

