IT Raids: ‘पुष्पा’सह अनेक नामांकित निर्मात्यांच्या घरावर, कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

साऊथ फिल्म इंडस्ट्रीत खळबळ; पृथ्वीराज सुकुमारनसह इतर सेलिब्रिटींच्या घरावर आयटीचे छापे

IT Raids: 'पुष्पा'सह अनेक नामांकित निर्मात्यांच्या घरावर, कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे
पृथ्वीराज सुकुमारनसह इतर सेलिब्रिटींच्या घरावर आयटीचे छापे Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 2:00 PM

केरळ: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. केरळ आणि तमिळनाडूच्या आयकर विभागाने काही नामांकित मल्याळम चित्रपट निर्मात्यांच्या आणि अभिनेत्यांच्या घरावर छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एर्नाकुलम जिल्ह्यात ही कारवाई केली जातेय. या छापेमारीत अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडून कोणतीच मदत घेतली नाही. यामुळे या छाप्यांच्या कारवाईबद्दल भुवया उंचावल्या जात आहेत.

प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन याच्या घरापासून छापेमारीची सुरुवात झाली. इतर नामांकित निर्माते अँटनी पेरुंबवुर, अँटो जोसेफ आणि लिस्टिन स्टीफन यांच्याही घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. छापेमारीची ही कारवाई सकाळी 7.45 वाजताच्या सुमारास सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरूच होती.

या संपूर्ण घटनेबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात आहे. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या यशात निर्माते अँटनी पेरुंबवुर यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण मोहनलाल यांच्या बहुतांश चित्रपटांची निर्मिती त्यांनीच केली होती. तर जोसेफ यांचं सुपरस्टार ममूटी यांच्यासोबत जवळचं नातं आहे.

हे सुद्धा वाचा

‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या मैत्री कंपनीच्या मालकासह त्यांच्याशी संबंधित इतरांवरही आयटी विभागाने छापे टाकले आहेत. यलमंचिली रविशंकर, नवीन अर्नेनी आणि चेरूकुरू यांच्या कार्यालयांसह पंधरा ठिकाणी ही मोठी कारवाई झाली आहे. मैत्री या निर्मिती कंपनीने पुष्पा, श्रीमंतुडू यांसारख्या तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या मोठ्या निर्मिती कंपन्यांनी करचुकवेगिरी केली का, याचा तपास आयकर विभागाचे अधिकारी करत आहेत. पृथ्वीराज सुकुमारन, मोहनलाल, ममूटी ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील खूप मोठी नावं आहेत. त्यामुळे या कारवाईची विशेष चर्चा होत आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.