Raj Thackeray | डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान, नेमकं काय म्हणाले?
भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आज देशभरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने सकाळपासूनच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आज देशभरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने सकाळपासूनच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. मुंबईतील चैत्यभूमी परिसरात पहाटेपासूनच अनुयायांची मोठी गर्दी उसळली असून, संपूर्ण परिसरात निळ्या पताका आणि “जय भीम”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले आहे. याच पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, ज्ञानदान कार्यक्रम, व्याख्याने तसेच प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत नागरिक मोठ्या उत्साहात या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.
दरम्यान, संपूर्ण राज्यात आणि देशभरात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून, विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांचे विचार पुन्हा एकदा अधोरेखित होत आहेत.
आता याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. त्यासोबतच राज ठाकरे यांनी या पोस्टद्वारे राजकारण्यांसह सर्वसामान्यांचे कानही टोचले आहेत. जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील, तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो, असा सल्ला राज ठाकरेंनी या पोस्टद्वारे दिला आहे.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
अकोला महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्येच राडा; शिंदेसेना-भाजप आमनेसामने

