AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लांब दाट केसांसाठी या आयुर्वेदिक तेलाचा करा वापर, जाणून घ्या तेल बनवण्याची घरगुती पद्धत

केस कमकुवत होणे आणि स्कॅल्पचे आरोग्य खराब होण्याची काही कारणे आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी या आयुर्वेदिक तेलाचा वापर करा. चला तर मग हे तेल तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवू शकता ते जाणून घेऊयात.

लांब दाट केसांसाठी या आयुर्वेदिक तेलाचा करा वापर, जाणून घ्या तेल बनवण्याची घरगुती पद्धत
ayurvedic oil
| Edited By: | Updated on: Apr 15, 2026 | 12:02 AM
Share

वाढत्या प्रदुषणामुळे आणि खाण्यपिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्यासोबतच आता केसांच्या समस्या देखील उद्भवत आहेत. त्यातच केसांच्या समस्या कमी करण्यासाठी आयुर्वेदात अनेक प्रभावी औषधी वनस्पती आहेत. कारण औषधी वनस्पती केवळ केस गळणेच थांबवत नाही तर केसांच्या वाढीस देखील प्रोत्साहन देतात. या लेखात आपण केसांच्या वाढीस उपयोगी असे आयुर्वेदिक तेल कसे तयार करायचे आणि त्यांचा वापर कसा करावा ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

बाजारात अशी अनेक प्रोडक्ट आहेत जे तुमचे केस निरोगी ठेवण्याचा दावा करतात, पण बाजारात मिळणारे प्रत्येक प्रोडक्ट हे केमिकलमुक्त असतात असे नाही. त्यासाठी नैसर्गिक उपाय खूप प्रभावी काम करतात. चला तर मग आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि काही घरगुती साहित्य वापरून घरीच केसांचे तेल बनवा आणि मजबूत दाट बनवा.

या साहित्यांच्या मदतीने घरगुती पद्धतीने बनवा आयुर्वेदिक तेल

तेल बनवण्यासाठी, तुम्हाला सुमारे 1 लिटर खोबरेल तेल, भृंगराज (तुम्ही बाजारातून ताजे किंवा सुके भृंगराज आणि पावडर विकत घेऊ शकता), जटामांसी (स्पाइकनार्ड किराणा दुकानात सहज उपलब्ध), आवळा (4 ताजे आवळे किंवा २ चमचे पावडर), ब्राह्मी (2 चमचे पावडर किंवा थोडी सुकी ब्राह्मी), जास्वंदीची फुले (4-5 ताजी किंवा सुकी), 10-12 जास्वंदीच्या झाडाची पाने , रोझमेरी (ताजी किंवा सुकी – २ चमचे) लागतील. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचीही तुम्हाला गरज लागेल, जसे की कलौंजी, मेथीचे दाणे, अळशी.

तेल कसे बनवायचे?

हे केसांचे तेल बनवायला खूप सोपे आहे. तेल कोणत्याही प्रकारे गरम करण्याची गरज नाही; त्याऐवजी ते हळूहळू उष्णतेने तयार होते. ज्यामुळे सर्व औषधी वनस्पतींचे फायदेशीर गुणधर्म तेलात उतरतात.

एक मोठी काचेची बाटली किंवा बरणी घ्या. त्यात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जटामांसी, जास्वंदीची फुले, पाने यांची लहान तुकडे करून त्यात टाका. आता त्यात रोझमेरी, कलौंजी, मेथीचे दाणे हलकेच बारीक करून त्यात अळशी यांसारखे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. हे तेल दररोज सूर्यप्रकाशात ठेवा. किमान 10 दिवसांनंतर तुमचे तेल तयार होईल. जसजसे सर्व घटक शोषले जाऊ लागतील तसतसा खोबरेल तेलाचा रंग हळूहळू बदलू लागेल हे तुमच्या लक्षात येईल.

अशा प्रकारे तेल वापरा

शॅम्पू लावण्याच्या किमान तीन तास आधी हे तेल तुमच्या स्कॅल्पला व्यवस्थित लावा आणि नंतर पूर्णपणे धुवा. तुम्ही हे आठवड्यातून किमान दोनदा लावले पाहिजे. जर तुमचे केस जास्त तेलकट नसतील, तर तुम्ही ते रात्रभर लावूनही ठेवू शकता.

या तेलाचे केसांना होणारे फायदे

या तेलात आवळा असतो, जो तुमच्या केसांचे पोषण करतो आणि कोंडा दूर करतो. ब्राह्मी, भृंगराज आणि जटामांसी तुमचे केस मजबूत करतात, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास आणि ते काळे होण्यास मदत होते. भृंगराज, ज्याला केशराज असेही म्हणतात त्याचा वापर केसांच्या अनेक उत्पादनांमध्ये केला जातो. मेथीचे दाणे व कलौंजी आणि अळशी हे देखील केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री...
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री....
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा...
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा....
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात.
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक.
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान.
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार.
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.