Ajinkya Rahane: रिटायरमेंटनंतर बीसीसीआय अजिंक्य रहाणेला किती पेन्शन देणार? जाणून घ्या

अजिंक्य रहाणे याने क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम देण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि प्रोफेशनल क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. भविष्यात अजिंक्य रहाणे नव्या भूमिकेत दिसू शकतो. तुर्तास तरी तसं काही नाही. आता बीसीसीआयकडून पेन्शन लागू होणार आहे. त्याला किती रक्कम मिळणार माहिती आहे का?

Ajinkya Rahane: रिटायरमेंटनंतर बीसीसीआय अजिंक्य रहाणेला किती पेन्शन देणार? जाणून घ्या
Ajinkya Rahane: रिटायरमेंटनंतर बीसीसीआय अजिंक्य रहाणेला किती पेन्शन देणार? जाणून घ्या
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 30, 2026 | 7:04 PM

Ajinkya Rahane Retirement: टीम इंडियाच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 19 वर्षांपासून सुरू असलेल्या क्रिकेट कारकि‍र्दीला त्याने पूर्णविराम लावला आहे.सोशल मीडियावर कॅप नंबर 278 साइनिंग ऑफ असं लिहून आंतरराष्ट्रीय कारकि‍र्द संपल्याचं जाहीर केलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत त्याने बीसीसीआय, सहकारी, पत्नी आणि लाखो चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार व्यक्त केले आहेत. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने कधीच कसोटी सामना गमावलेला नाही. त्याच्या नेतृत्वात भारताने सहा कसोटी सामने खेळले. यात चार सामने तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होते. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला, तर सामना ड्रॉ झाला. अफगाणिस्तानला नमवलं, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. अशी सर्व कारकिर्द असताना अजिंक्य रहाणे पुढे काय करणार? असा प्रश्नही आहे. तर त्याला बीसीसीआयकडून किती पेन्शन मिळणार? असंही विचारलं जात आहे. चला तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात

अजिंक्य रहाणेला किती पेन्शन मिळणार?

अजिंक्य रहाणे भारताकडून 85 कसोटी सामन्यात खेळला आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या रिटायर्स प्लेयल वेल्फेयर पॉलिसीच्या नियमांतर्गत खूपच पुढे आहे. कारण या योजनेत माजी क्रिकेटपटू किमान 25 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळला असेल तर त्याला आजीवन 70 हजारांची मासिक पेन्शन मिळते. अजिंक्य रहाणे 25 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्यामुळे टॉप पेन्शन ब्रॅकेटमध्ये बसतो. त्यामुळे त्याला दरमहा 70 हजार रुपये मिळतील. पेन्शनसाठी निधी बीसीसीआयच्या नियमित कार्यकारी अर्थसंकल्पाऐवजी एका समर्पित कल्याणकारी प्रणालीद्वारे उभारला जातो.या निधीचा एक मोठा भाग आयपीएल प्लेऑफ सामने आणि स्टेडियम तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलातून येतो.

अजिंक्य रहाणेला दोन पेन्शन मिळणार!

अजिंक्य रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची माजी खेळाडूंसाठी पेन्शन योजना आहे. मग बीसीसीआय आणि एमसीएकडून दोन पेन्शन मिळणार का? तर तसं अजिबाद नाही. बीसीसीआयच्या नियमानुसार, केंद्रीय मंडळ आणि राज्य संघटनेकडून एकाच वेळी पेन्शन घेण्याची परवानगी नाही. दोन्हीसाठी पात्र असलेल्या खेळाडूंनी एक पेन्शन योजना निवडावी लागते. खेळाडू सहसा जास्त पेन्शन असलेली योजना निवडतात.

रहाणे बीसीसीआयमध्ये सामील झाला तर पेन्शनचं काय?

अजिंक्य रहाणे बीसीसीआयच्या एखाद्या पदावर किंवा राष्ट्रीय संघात रुजू झाला तर ते पगारी पद असणार आहे. अशा वेळी त्याच्या या कारकि‍र्दीत पेन्शन थांबवली जाईल. हे काम संपलं की पुन्हा पेन्शन सुरू होईल. दरम्यान, समालोचन, क्रिकेट विश्लेषण किंवा आयपीएल फ्रेंचायझी मार्गदर्शक असेल तर पेन्शनवर काहीच परिणाम होणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us