NZ vs SL Super 8 : श्रीलंकेची आर या पारची लढाई, न्यूझीलंड विरुद्ध बॉलिंग, किवींना किती धावांवर रोखणार?

New Zealand vs Sri Lanka Super 8 Toss And Playing 11 : न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी सेमी फायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे या सामन्याकडे दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

NZ vs SL Super 8 : श्रीलंकेची आर या पारची लढाई, न्यूझीलंड विरुद्ध बॉलिंग, किवींना किती धावांवर रोखणार?
NZ vs SL Super 8 Toss
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 25, 2026 | 7:33 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 46 व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील दुसरा सामना आहे. उभयसंघातील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार दासून शनाका याने फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. दोन्ही संघांसाठी सेमी फायनलमधील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना आर या पार असा आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघांकडून बदल

श्रीलंका आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. दोन्ही संघांकडून प्रत्येकी 1-1 बदल करण्यात आला आहे. कामल मिशारा याला बाहेर करण्यात आलं आहे. तर अनुभवी चरिथ असलंका याचा समावेश करण्यात आला आहे. तर न्यूझीलंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये जेम्स निशाम याच्या जागी कोल मॅककोंची याला संधी देण्यात आली आहे.

श्रीलंका टी 20I वर्ल्ड कपमध्ये सरस

टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात श्रीलंका न्यूझीलंडवर वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. श्रीलंकेने या 6 पैकी सर्वाधिक 4 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला 2 सामने जिंकता आले आहेत.

तसेच श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हा 29 वा टी 20I सामना आहे. श्रीलंकेने याआधी झालेल्या 28 पैकी 11 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने श्रीलंकेला 16 वेळा पराभवाचं पाणी पाजलं आहे. अशात आता उपांत्य फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणता संघ विजय मिळवण्यात यशस्वी होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित असलंका, पवन रथनायके, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश तीक्षाना आणि दिलशान मधुशंका.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम सायफर्ट(विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोंची, मॅट हेन्री, ईश सोधी आणि लॉकी फर्ग्युसन.