IPL 2021: केएल राहुल नावाचं तुफान, चेन्नईच्या गोलंदाजांना धोपटलं, नाबाद 98 धावा ठोकत संघाला मिळवून दिला विजय

| Updated on: Oct 07, 2021 | 7:12 PM

आयपीएल 2021 मधील 53 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्स या संघामध्ये पार पडला. ज्यामध्ये पंजाबने 6 गडी आणि 7 षटकं राखून चेन्नईवर विजय मिळवला.

IPL 2021: केएल राहुल नावाचं तुफान, चेन्नईच्या गोलंदाजांना धोपटलं, नाबाद 98 धावा ठोकत संघाला मिळवून दिला विजय
केएल राहुल
Follow us on

IPL 2021: याआधीच प्लेऑफमध्ये गेलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला पंजाब किंग्सने 6 गडी आणि 7 ओव्हर राखून मात दिली आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाबाद 98 धावा ठोकत संघाचा विजय सोपा केला. विशेष म्हणजे या विजयामुळे पंजाबचा संघ गुणतालिकेतही मुसंडी मारण्यात यशस्वी झाला आहे. ते गुणतालिकेत 5 व्या स्थानी पोहोचले आहेत.

चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात पंजाबने प्रथम गोलंदाजी करत चेन्नईला 134 धावांमध्ये रोखले. त्यानंतर पंजाबने फलंदाजीला सुरुवात केली. संघाचे सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद झाले. पण कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुल मात्र अखेरपर्यंत टिकून राहिला आणि त्याने नाबाद 98 धावा ठोकत पंजाबचा विजय पक्का केला.

फाफची झुंज व्यर्थ

प्रथम फलंदाजी मिळालेल्या चेन्नईच्या संघाला फलंदाजीत साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांचे बहुतेक फलंदाज सपशेल फेल होताना दिसले. केवळ सलामीवीर फाफ डुप्लेसीसने एकहाती झुंज देत 76 धावा कुटल्या. त्याने 55 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार खेचत 76 धावा केल्या. त्याला इतर कोणत्याच खेळाडूची साथ न मिळाल्याने चेन्नईचा संघ केवळ 134 धावापर्यंत मजल मारु शकला. पंजाबकडून अर्शदीप आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी 2 तर शमी आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट पटकावली.

केएल राहुलचं तुफानी अर्धशतक

चेन्नईने समोर ठेवलेले्या 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबचा सलामीवीर मयांक 12 धावा करुन बाद झाला. शार्दूलने त्याची विकेट घेतली. त्याच षटकात शार्दूलने सरफराजलाही बाद केले. त्यानंतर शाहरुख खानला दीपक चाहरने बाद केले. तर अखेरच्या काही षटकात शार्दूने सामन्यातील तिसरी विकेट घेत मार्करमला बाद केले. पण केएल राहुलला बाद करणे चेन्नईच्या गोलंदाजाना जमले नाही. त्याने केवळ 42 चेंडूत 7 चौकार आणि तब्बल 8 षटकार ठोकत नाबाद 98 धावा केल्या. ज्यासोबतच संघाला 6 गडी आणि 7 ओव्हर राखून विजय मिळवून दिला.

पंजाबची गुणतालिकेत मुसंडी

प्लेऑफच्या शर्यतीत बरीच मागे पडलेली पंजाबची टीम आजच्या विजयामुळे गुणतालिकेत पाचव्या स्थानी गेली आहे. पण यासोबतच त्यांचे या फेरीतील सामनेही संपले आहेत. त्यांनी 14 सामन्यातील 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. दरम्यान केकेआर किंवा मुंबई यांनी एकही विजय मिळवताच पंजाब स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. पण सध्यातरी ते स्पर्धेत आहेत.

हे ही वाचा

भारताचा किती द्वेष करणार पाकिस्तान? वर्ल्ड कपच्या जर्सीवर तिसऱ्याच देशाचं नाव

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहिद अफ्रिदीने शेअर केला विराटचा व्हिडीओ, म्हणाला…

T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराची कमाल, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला, विराटलाही मागे टाकत बाबरने रचला इतिहास

(In CSK vs PBKS match Punjab Kings with KL Rahuls Awsome Knock won with 6 Wickets in hands)