AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहिद अफ्रिदीने शेअर केला विराटचा व्हिडीओ, म्हणाला…

विराट कर्णधार असलेल्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाने अद्याप एकदाही आय़पीएलचं जेतेपद पटकावलेलं नाही. पण यंदा मात्र आरसीबी संघ दमदार प्रदर्शन करत आहे. ते प्लेऑफमध्येही पोहोचले आहेत.

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहिद अफ्रिदीने शेअर केला विराटचा व्हिडीओ, म्हणाला...
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान विराट आणि आफ्रिदी (संग्रहीत छायचित्र)
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 5:30 PM
Share

मुंबई: विराट कोहली (Virat Kohli) हा सद्यस्थितीला जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. विशेष म्हणजे वनडे, कसोटी आणि टी20 अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये विराट उत्कृष्ट फलंदाजी करतो.  क्लासिक फलंदाजीमुळे जगभरात प्रसिद्ध विराटचे जगभरात चाहते आहेत. दरम्यान क्रिकेट जगतातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू असणारा पाकिस्तानचा शाहिद अफ्रिदी (Shahid Afridi) यानेही कोहलीचं कौतुक करत चक्क त्याचा व्हिडीओ स्वत:च्या ट्विटरवरुन शेअर केला आहे.

विराटने नुकताच त्याचा आरसीबीच्या सामन्यापूर्वी सराव करतानाचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्याच व्हिडीओला रिट्विट करत अफ्रिदीने कोहलीचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये अफ्रिदीने लिहिलं आहे, “या फलंदाजाला फलंदाजी करताना पाहणं एक पर्वणीच असते. असे महान खेळाडू सरावादरम्यान आपलं 100 टक्के योगदान देतात.”

आरसीबी यंदा उत्तम फॉर्ममध्ये

आतापर्यंत एकदाही आयपीएलचं विजेतेपद न पटकावलेल्या आरसीबी संघाला यंदा मात्र जेतेपद पटकावण्याची पूर्ण संधी आहे. त्यांचा संघ यंदा प्लेऑफमध्ये गेला आहे. यंदाच्या पर्वात आतापर्यंत झालेल्या 13 सामन्यातील 8 सामने जिंकत आरसीबीने 16 गुण खात्यात जमा केले आहेत. ज्यामुळे त्यांची यंदाची कामगिरी दरवर्षीच्या तुलनेत उत्तम सुरु आहे.

विराट कर्णधार म्हणून शेवटचं वर्ष

दरम्यान आरसीबीचा कर्णधार विराटने काही दिवसांपूर्वी आगामी टी20 विश्वचषकानंतर भारतीय टी20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने आरसीबीचं कर्णधारपदही या आयपीएलनंतर सोडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा 

VIDEO: रोहित शर्माचं नवं चँलेज, प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करुन चाहत्यांना सांगितलं ओळखायला, तुम्ही ओळखू शकता का?

T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?

T20 WC : भारत टी-20 विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार, मात्र ‘या’ तीन संघांचं तगडं आव्हान

(Shahid afridi Shares Virat kohlis practice session video says hes legend give his 100 percent in practice)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.