AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : रोहित शर्माकडून 3 दिग्गज खेळाडूंची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ शेअर करत म्हणतो, ‘ओळखून दाखवाच’

भारताचा सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. आताही त्याने एक नवा व्हिडीओ टाकला आहे.

IPL 2021 : रोहित शर्माकडून 3 दिग्गज खेळाडूंची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ शेअर करत म्हणतो, 'ओळखून दाखवाच'
रोहित शर्मा
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 07, 2021 | 3:10 PM
Share

मुंबई : आयपीएलचं यंदाच्या पर्वात (IPL 2021) तब्बल 5 वेळा विजयश्री मिळवलेला मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ अद्यापही प्लेऑफमध्ये पोहोचलेला नाही. प्लेऑफमध्ये दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरु हे संघ गेले असून तिसऱ्या स्थानासाठी कोलकाता आणि मुंबई या दोघांमध्ये सर्वाधिक चुरस आहे. दरम्यान मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र त्याचा ताण हलका करण्यासाठी काही हटके व्हिडीओ करत आहे.

काही दिवसांपूर्वी पत्नी रितीकासोबत प्रँक व्हिडीओ केल्यानंतर आता रोहितने प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करणारा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये तो 10 सेकंदाची तीन प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करतो आणि चाहत्यांना ओळखायला सांगतो. या व्हिडीओवर अनेक क्रिकेटपटूंसह नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. तर या कमेंट आणि क्रिकेटपटू कोण हे आम्ही सांगण्यापूर्वी तुम्हीच हा व्हिडीओ पाहून ओळखण्याचा प्रयत्न करा.

पृथ्वीचा अंदाज बरोबर?

या व्हिडीओमध्ये असणारे तीन क्रिकेटपटू कोण? यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये युवा फलंदाज पृथ्वी शॉने जवळपास बरोबर गेस केलं आहे. तर व्हिडीओ पाहून पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर आणि शेवटचा हरभजन सिंग हे तर सर्वांना कळतं. पण मधला खेळाडू कोण यावर अनेक वेगळी उत्तरं आहेत. यात पृथ्वीने राहुल द्रविड असं गेस केलं आहे. जे जवळपास बरोबर असावा. पृथ्वीशिवाय प्रियम गर्गने मात्र मधला क्रिकेटपटू महेला जयवर्धने असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी मोहम्मद कैफ, वीरेंद्र सेहवाग, स्टीव स्मिथ अशा कमेंट्सही केल्या आहेत.

चौथ्या स्थानासाछी केकेआर आणि मुंबईत चुरस

सध्या केकेआर आणि मुंबई दोघांनी 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. पण केकेआरचा नेट रनरेट +0.294 असून मुंबईचा -0.048 इतका आहे. त्यामुळे केकेआर चौथ्या आणि मुंबई पाचव्या स्थानावर आहे. यामुळेच दोन्ही संघाचा अखेरचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून केकेआरचा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्ससोबत तर मुंबईचा शुक्रवारी सनरायजर्स हैद्राबादसोबत होणार आहे.

हे ही वाचा

शोएब अख्तरचा वेग अजूनही तसाचं, मैदानावर पुन्हा उतरत भेदक गोलंदाजी, पाहा VIDEO

IPL 2021: राजस्थानविरुद्ध तुफानी अर्धशतकानंतर बास्केटबॉल कोर्टमध्येही इशानची कमाल, पाहा VIDEO

T20 WC : भारत टी-20 विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार, मात्र ‘या’ तीन संघांचं तगडं आव्हान

(Hitman Rohit Sharma does action of famous cricketers guess the players see video)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...