IPL 2021: राजस्थानविरुद्ध तुफानी अर्धशतकानंतर बास्केटबॉल कोर्टमध्येही इशानची कमाल, पाहा VIDEO

मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयामध्ये युवा फलंदाज इशान किशनचं अर्धशतक महत्त्वाचं ठरलं.

IPL 2021: राजस्थानविरुद्ध तुफानी अर्धशतकानंतर बास्केटबॉल कोर्टमध्येही इशानची कमाल, पाहा VIDEO
इशान किशन
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 4:33 PM

IPL 2021: मंगळवारी (5 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI)  या दोन संघामध्ये आय़पीएलचा 51 वा सामना पार पडला. सामन्यात मुंबईने दमदार असा विजय राजस्थान संघावर मिळवला. दरम्यान या विजयात आधी मुंबईच्या गोलंदाजानी उत्कृष्ट गोलंदाजी करत राजस्थानला अवघ्या 90 धावांवर रोखलं. ज्यानंतर 91 धावाचं सोपं लक्ष्यही केवळ 8.2 षटकात पूर्ण केलं. दरम्यान हे लक्ष्य गाठण्यात महत्त्वाची खेळी मुंबईचा युवा फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) केली. त्याने धडाकेबाद अर्धशतक ठोकलं. दरम्यान अर्धशतक ठोकण्याची कमाल करणारा इशान क्रिकेटसह बास्केबॉलमध्येही तरबेज असल्याचं एका व्हि़डीओतून समोर आलं आहे.

मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये इशान उत्तम अशा बास्केटबॉल स्किल्स दाखवत आहे. तो अगदी अप्रतिम रित्या बॉलला बास्केटमध्ये टाकत असून हा व्हिडीओही उत्तम पद्धतीने शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस नेटकरी पाडत आहेत. तर तुम्हीही हा व्हिडीओ पाहाच…

इशानचं धडाकेबाज अर्धशतक आणि मुंबई विजयी

91 धावांचं सोपं लक्ष्य पार करताना मुंबईचा सलामीवीर कर्णधार रोहितने चांगली सुरुवात केली. पण 22 धावा होताच चेतन सकारियाने त्याला बाद केलं. त्यानंतर सूर्यकुमारही 13 धावा करुन बाद झाला. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली. पण सलामीवीर इशान किशन मात्र एका बाजूने तुफानी फलंदाजी करतच होता. त्याने अवघ्या 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 50 धावा केल्या आणि सोबतच मुंबईला अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.

चौथ्या स्थानासाछी केकेआर आणि मुंबईत चुरस

सध्या केकेआर आणि मुंबई दोघांनी 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. पण केकेआरचा नेट रनरेट +0.294 असून मुंबईचा -0.048 इतका आहे. त्यामुळे केकेआर चौथ्या आणि मुंबई पाचव्या स्थानावर आहे. यामुळेच दोन्ही संघाचा अखेरचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून केकेआरचा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्ससोबत तर मुंबईचा शुक्रवारी सनरायजर्स हैद्राबादसोबत होणार आहे.

हे ही वाचा 

T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?

T20 world Cup 2021 पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर IPL मध्ये दुखापतग्रस्त, विश्वचषकालाही मुकणार

उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर ‘या’ खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला

(Mumbai Indians cricketer Ishan Kishan basket ball skills video on instagram)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.