T20 world Cup 2021 पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर IPL मध्ये दुखापतग्रस्त, विश्वचषकालाही मुकणार

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी इंग्लंड क्रिकेटने काही दिवसांपूर्वीच आपले शिलेदार जाहीर केले होते. पण यातीलच एका खेळाडूला आयपीएल स्पर्धा खेळताना दुखापत झाली आहे.

T20 world Cup 2021 पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर IPL मध्ये दुखापतग्रस्त, विश्वचषकालाही मुकणार
इंग्लंड क्रिकेट संघ

लंडन : क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिला असून स्पर्धेत सहभागी देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. पण यातच इंग्लंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन (Sam Curran) चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून (CSK) आयपीएल (IPL 2021) खेळत असताना दुखापतग्रस्त झाला आहे. ज्यामुळे तो उर्वरीत आयपीएलसह आगामी टी 20 विश्वचषकाच्या स्पर्धेलाही मुकणार आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी सॅम करनच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. तसंच यावेळी तो उर्वरीत आयपीएल आणि आगामी टी 20 विश्वचषक खेळणार नसल्याचीही माहिती दिली. सॅमहा इंग्लंडने जाहीर केलेल्या 15 सदस्यीय क्रिकेट संघात होता आणि आगामी विश्वचषक युएईत होणार असल्याने सरावासाठी आयपीएल खेळायला गेला होता. पण याठिकाणी त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने तो काही सामने खेळला नव्हता.

सॅमच्या जागी भाऊ टॉमला संधी

दरम्यान सॅम करनला दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकावे लागणार असल्याने इंग्लंड क्रिकेट संघाला एका अष्टपैलू खेळाडूची गरज निर्माण झाली. ज्यासाठी त्यांनी सॅमचचा भाऊ टॉम करनला संघात स्थान दिलं आहे. टॉम हा राखीव खेळाडूंमध्ये होता. सॅमनंतर आता त्याला मुख्य संघात घेतले आहे. सॅम डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज असून टॉम मात्र उजव्या हाताचा फलंदाज आणि गोलंदाज आहे.

टी- 20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ :

इंग्लंड संघ : इयॉन मॉर्गन, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियम लिव्हिंगस्टन, डेविड मलान, टाइमल मिल्स, आदिल राशिद, जेसन रॉय, डेविड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड

राखीव : लियम डॉसन, जेम्स विन्स

हे ही वाचा

T20 World Cup 2021 च्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय, ICC ने दिली माहिती

IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान

पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलने देश सोडला

(England cricket team and csk allrounder sam curran out of ipl 2021 and icc t20 world cup due to injury)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI