T20 World Cup 2021 च्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय, ICC ने दिली माहिती

आयपीएल संपताच लगेचच 17 ऑक्टोबरपासून युएईमध्येच आगामी टी20 विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल.

T20 World Cup 2021 च्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय, ICC ने दिली माहिती
टी-20 विश्वचषक
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Oct 04, 2021 | 8:51 PM

मुंबई : संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आगामी टी-20 विश्वचषकाकडे (ICC T20 World Cup) लागून राहिले आहे. आयसीसीने (ICC) सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच भारतीय संघही जाहीर केला. आता या स्पर्धेसंबधी एक मोठी माहिती समोर आली आहे. या बहुचर्चित स्पर्धेला प्रेक्षकांना मैदानात हजेरी लावयची संधी मिळणार का? याबद्दल आयसीसीने माहिती दिली आहे.

आयसीसीचे अँक्टिंग सीईओ जेफ अलार्डिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ओमान आणि यूएईमध्ये टी 20 क्रिकेट विश्वचषकासाठी प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी आयसीसी उत्सुक आहे. क्रिकेटप्रेमींना त्यांची आवडती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. बीसीसीआय, अमिरात क्रिकेट बोर्ड आणि ओमान क्रिकेट यांच्यासह स्थानिक सरकारच्या सहकार्याबद्दल धन्यवाद असं म्हणत या स्पर्धेला प्रेक्षकांना येण्याची संधी मिळेल असं आयसीसीने सांगितलं. आभार. त्यांनी फॅन्सना सुरक्षित वातावरणात क्रिकेट पाहता येईल, याची व्यवस्था केली आहे.’

सुरक्षा महत्त्वाची

जेफ अलार्डिस यांनी यावेळी बोलताना म्हणाले, ‘या स्पर्धेसाठी सर्वचजण उत्सुक आहेत. पण ही संपूर्ण स्पर्धा सुरक्षित पार पडावी यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत. सर्वांनी त्याला पाठिंबा देणे गरजेचे आहे.’ दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे भारतातून स्पर्धा युएई आणि ओमान याठिकाणी घेतली जात आहे. त्यामुळे बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले, ‘या आगामी स्पर्धेला फॅन्सना हजेरी लावण्याची संधी मिळेल. ही फार आनंदाची गोष्ट आहे. दरम्यान या निर्णयाकरता मी ओमान आणि युएई देशाचे आभार मानतो. तसेच सर्वांनी काळजी घ्यावी.’

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

हे ही वाचा

T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराची कमाल, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला, विराटलाही मागे टाकत बाबरने रचला इतिहास

T20 WC 2021 : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची रंगत वाढली, स्टेडियममधील फॅन्सच्या एंट्रीला ग्रीन सिग्नल

IPL 2021: गुणतालिकेत जागा 1, दावेदार 3, ‘या’ फॉर्म्युलाने सुटणार प्ले ऑफचं गणित

(For Upcoming T 20 world cup 2021 ICC gave crowd permission at stadium )

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें