T20 WC 2021 : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची रंगत वाढली, स्टेडियममधील फॅन्सच्या एंट्रीला ग्रीन सिग्नल

टी -20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) एक चांगली बातमी समोर आली आहे. ही बातमी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी खूपच आनंद देणारी आहे.

T20 WC 2021 : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची रंगत वाढली, स्टेडियममधील फॅन्सच्या एंट्रीला ग्रीन सिग्नल
Ind vs Pak

मुंबई : टी -20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) एक चांगली बातमी समोर आली आहे. ही बातमी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी खूपच आनंद देणारी आहे, कारण, आयसीसी आणि स्पर्धेचे यजमान बीसीसीआयने स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे. याचा अर्थ असा की, टी -20 विश्वचषकाचे सामने शांततेत, प्रेक्षकांविना खेळवले जाणार नाहीत, तर स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळणार नाही. क्रिकेटचे वेड असलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, यूएई आणि ओमान येथे होणाऱ्या आयसीसी टी – 20 विश्वचषकातील सामन्यांच्या तिकिटांची विक्रीदेखील सुरू झाली आहे. (there will be fun in India-Pakistan cricket war, entry of fans in the stadium for T20 WC got green signal)

ही माहिती शेअर करताना आयसीसीने म्हटले आहे की यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी – 20 विश्वचषकासाठी स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांना परवानगी असेल. यासह, तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू झाली आहे. आयसीसीच्या या मेगा इव्हेंटमध्ये सुपर 12 स्टेजचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. तर या स्पर्धेतील सर्वात हायप्रोफाईल सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान एकमेकांसमोर उभे असतील.

तिकीटांची विक्री सुरु

आयसीसी टी – 20 विश्वचषकाच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेसाठी तिकिटांची सुरुवातीची किंमत ओमानमधील 10 ओमानी रियाल आणि यूएईमध्ये 30 दिरहम ठेवण्यात आली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, www.t20worldcup.com/tickets या संकेतस्थळावरून तिकिटे खरेदी करता येतील.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

इतर बातम्या

KKR vs SRH : सलामीच्या सामन्यातच उम्रान मलिकची कमाल, नावे केला गोलंदाजीचा जबरदस्त रेकॉर्ड, पाहा VIDEO

IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट

RCB vs PBKS: पंचाचा चूकीचा निर्णय, राहुल भडकला, दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो पंचाला तात्काळ बडतर्फ करा, वाचा नेमकं प्रकरण काय?

(there will be fun in India-Pakistan cricket war, entry of fans in the stadium for T20 WC got green signal)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI