T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराची कमाल, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला, विराटलाही मागे टाकत बाबरने रचला इतिहास

टी20 विश्वचषक सुरु होण्यासाठी आता काही काळच शिल्लक आहे. दरम्यान या स्पर्धेतील सुरुवातीच्या काळातच भारत आणि पाकिस्तान हे संघ समोरासमोर येणार आहेत.

1/4
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने T20 क्रिकेटचा बॉस ख्रिस गेल (Chris Gayle) याचा एक मोठा रेकॉर्ड तोडला आहे. T20 क्रिकेटमध्ये गेल सर्वात वेगवान फलंदाज असल्याचे कायम म्हटले जाते. पण आता बाबरने त्याच्या नावावर केलेल्या नव्या रेकॉर्डमुळे आता त्याला ही पदवी मिळाली आहे. बाबरने सर्वात जलदगतीने टी20 क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या आहेत. बाबरने ही कमाल पाकिस्तानात सुरु असलेल्या नॅशनल T20 कपमध्ये केली आहे.

2/4
बाबर आजमने T20 क्रिकेटमध्ये त्याच्या 187 व्या डावात 7000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याच्याआधी गेलने या टप्प्यासाठी 192 सामन्यांचा कालावधी घेतला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहीली असून त्याने 212 डावानंतर 7000 धावा केल्या आहेत.

3/4
बाबर आजमने सर्वात जलदगलतीने 7000 धावा केल्याच आहेत. पण सर्वात कमी वयातही हा कारनामा केला आहे. याआधी दक्षिण आफ्रीकेचा क्विंटन डि कॉक याने 28 वर्ष आणि 285 दिवसांचा असताना 7000 धावा केल्या होत्या. पण बाबरने 26 वर्ष 353 दिवसांचा असताना हा कारनामा केला आहे. या यादीतही विराट तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 28 वर्ष आणि 364 दिवसांचा असताना ही कामगिरी केली होती.

4/4
बाबर T20 क्रिकेटमध्ये 7000 धावा करण्याआधी 3000, 4000 आणि 6000 T20 धावा जलदगतीने  करणारा आशियाई फलंदाज देखील बनला आहे. दरम्यान बाबरचा टी20 मधील हा फॉर्म पाहता आगामी टी20 विश्वचषकात भारतीय संघाची डोकेदुखी वाढू शकते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI