AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान

चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले होते. त्यामुळे आजचा सामना औपचारिक होता. पण गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नईला नमवत दिल्लीने विजय स्वत:च्या नावे केला आहे.

IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान
शिखरने महत्त्वपूर्ण 39 धावा केल्या
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 11:20 PM
Share

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 (IPL 2021) व्या हंगामातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या दोन्ही संघामध्ये 50 वा सामना पार पडला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवलेल्या या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs CSK) हे संघ आमने सामने होते. अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंच गेला. पण अखेर दिल्लीने 3 गडी राखून गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नईला मात देत सामना जिंकला.

सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने गोलंदाजी निवडली होती. जो निर्णय दिल्लीने बरोबर करत चेन्नई संघाला अवघ्या 136 धावांत आटोपलं. दिल्लीकडून अक्षर पटेलने 2 तर आवेश खान, नॉर्खिया आणि आश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. पण सर्वच गोलंदाजनी अतिशय कमी धावा देत चेन्नईला 136 धावांवर रोखलं.

अंबाती रायडूची एकहाती झुंज

चेन्नईचे सलामीवीर फाफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड यांनी संपूर्ण हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. पण आजच्या सामन्यात दोघंही स्वस्तात तंबूत परतले. संपूर्ण संघात सर्वाधिक धावा अनुभवी खेळाडू अंबाती रायडूने केल्या.  त्याने 5 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 55 धावा झळकावल्या. त्याला धोनीने 18 धावांची मदत केली. तर उथाप्पाने देखील 19 धावा केल्या. ज्याच्या जोरावरच चेन्नईचा संघ किमान 136 धावा करुन दिल्लीसमोर 137 धावांचे आव्हान ठेवू शकला.

दिल्लीचा 3 विकेट्सनी विजय

सामन्याची खेळपट्टी गोलंदाजीच्या दृष्टीने उत्तम असल्याने दिल्लीचे बहुतेक फलंदाजही सामन्यात अपयशी ठरले. केवळ शिखर धवनने महत्त्वपूर्ण 39 धावा केल्या. ज्याला सुरुवातीला पृथ्वीने 18 आणि मध्यंतरी पंतने 18 धावांची साथ दिली. पण हे सगळे बाद झाल्यानंतर सामना चेन्नईच्या बाजूने झुकु लागला. पण वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हीटमायरने नाबाद 28 धावा ठोकत सामना दिल्लीच्या बाजूने वळवला. विशेष म्हणजे शेवटच्या 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना फलंदाजीला आलेल्या रबाडाने चौकार लगावत सामना दिल्लीला 3 विकेट्सनी जिंकून दिला. या रोमहर्षक विजयानंतर दिल्लीच्या हीटमायरने मैदानावर जल्लोष केला.

दिल्ली गुणतालिकेतही अव्वल

सामना सुरु होण्यापूर्वी चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघानी 12 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले असले तरी चेन्नईने अधिक नेट रनरेटच्या जोरावर पहिलं स्थान मिळवलं होतं. पण आता दिल्लीने चेन्नईला नमवत 13 सामन्यांपैकी 10 सामने जिंकत 20 गुण खात्यात मिळवले आहेत. ज्यामुळे ते गुणतालिकेतही पहिल्या स्थानी पोहोचले आहेत.

हे ही वाचा

हैद्राबाद संघाची फलंदाजी सर्वात रटाळ, पाहताना झोप लागते, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा हल्लाबोल

T20 World Cup 2021 च्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय, ICC ने दिली माहिती

IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट

(In DC vs CSK match Delhi Capitals won Match against Chennai superkings with 3 wickets in Hands)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.