AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैद्राबाद संघाची फलंदाजी सर्वात रटाळ, पाहताना झोप लागते, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा हल्लाबोल

कोलकाता नाईट रायडर्सने रविवारच्या सामन्यात सनरायजर्स हैद्राबाद संघाला 6 गडी राखून मात दिली. या सामन्यातबी हैद्राबादचे फलंदाज अपयशी झाल्याचे पाहायला मिळाले.

हैद्राबाद संघाची फलंदाजी सर्वात रटाळ, पाहताना झोप लागते, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा हल्लाबोल
सनरायजर्स हैद्राबादचा संघ
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 10:32 PM
Share

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 49 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (SRH) यांच्यात पार पडला. स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेल्या हैद्राबादने हा सामनाही 6 विकेट्सनी गमावला. दरम्यान हैद्राबाद संघाची फलंदाजी दरवेळीप्रमाणे मोठ्या प्रमाणात अपयशी झाली. संघातील एकाही खेळाडूला खास कामगिरी करता आली नाही. संघात सर्वाधिक धावा विल्यमसन (26), गार्ग (21) आणि अब्दुल समाद (25) यांनी केल्या. याखेरीज इतरांना 10 हून अधिक धावा करता आल्या नाहीत.

दरम्यान हैद्राबादच्या फलंदाजाच्या या खराब कामगिरीनंतर माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virendra sehwag) हैद्राबाद संघावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. हैद्राबादची फलंदाजी पाहताना अक्षरश: झोप लागते असं म्हणत सेहवागनं मजेमध्ये हैद्राबादच्या फलंदाजाना ‘झोपेच्या गोळ्या’ असंही म्हटलं आहे.

काय म्हणाला सेहवाग?

सेहवाग हैद्राबादच्या फलंदाजीबाबत म्हणाला ‘हैदराबादने सलामीवीर पटापट बाद झाल्यानंतर एकाही खेळाडूला खास कामगिरी करता आली नाही. कर्णधार विल्यमसन आणि प्रियम गर्गने डाव सांभाळायचा प्रयत्न केला. त्यानंतर अब्दुल समदने 3 षटकार ठोकले पण इतरांप्रमाणे तोही बाद झाला. त्यामुळी ही फलंदाजी पाहताना फलंदाज अगदी झोपेच्या गोळ्यांसारखे होते. शेवटच्या काही ओव्हरमध्ये मी झोपलो जाग आली तेव्हा हैद्राबादची फलंदाजी संपली होती.’

सामन्याचा लेखाजोखा

आजच्या  सामन्यात नाणेफेक जिंकत हैद्राबाद संघाने प्रथम फलंदाजी निवडली. पण हैद्राबादसाठी हा निर्णय़ चूकीचा ठरला. संघातील एकाही फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. ज्यामुळे संघ केवळ 115 धावाच करु शकला. संपूर्ण संघात सर्वाधिक धावा विल्यमसन (26), गार्ग (21) आणि अब्दुल समाद (25) यांनी केल्या. याखेरीज इतरांना 10 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. केकेआरकडून वरुण चक्रवर्ती, टीम साऊदी, शिवम मावी यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली.

दरम्यान केकेआरचा संघ 116 धावांचे सोपं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात आला. यावेळी केकेआरची फलंदाजीही तशी ढासळली पण केकेआरकडून सलामीवीर शुभमनने दमदार अर्धशतक (57) ठोकत एकहाती डाव सांभाळला. त्याच्या सोबत राणाने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेर कार्तिकने 18 महत्त्वपूर्ण धावा करत सामना केकेआऱला 6 विकेट्नसनी जिंकवून दिला.

हे ही वाचा

T20 World Cup 2021 च्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय, ICC ने दिली माहिती

IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट

IPL 2021 : विराटसेना विजयी, पंजाबवर 6 धावांनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवली एन्ट्री

(Virender sehwag Trolls SRH batters says they are like sleeping pills in SRH vs KKR match)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.