IPL 2021 : विराटसेना विजयी, पंजाबवर 6 धावांनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवली एन्ट्री

आज आयपीएलमध्ये सुपर संडे असून दिवसातील पहिला सामना नुकताच पार पडला. या सामन्य़ात पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) यांच्यातील सामन्यान आरसीबीने पंजाबर 6 धावांनी विजय मिळवला.

IPL 2021 : विराटसेना विजयी, पंजाबवर 6 धावांनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवली एन्ट्री
पंजाब किंग्स विरुद्ध आरसीबी सामन्यातील एक क्षण
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 7:38 PM

IPL 2021: आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज सुपर संडे आहे. आजच्या दिवसात दोन टी-20 सामने खेळवले जाणार असून यातील पहिला सामना नुकताच शारजाहच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal Challengers Banglore) पंजाब किंग्जवर (Punjab Kings) सहा धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे या विजयासोबतच कोहलीचा संघ प्लेऑफमध्येही दाखल झाला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये 12 पैकी 8 सामने जिंकत आरसीबीच्या नावावर 16 गुण आहेत. प्लेऑफमध्ये जाण्याच्या शर्यतीत असणाऱ्या इतर संघाच्या तुलनेत हे सर्वाधिक असून इतर संघाच्या उर्वरीत सामन्यांची संख्या पाहता आरसीबीच सर्वात पुढे राहिल. त्यामुळे त्यांनी प्लेऑफमध्ये आधीच स्थान मिळवलं आहे. चेन्नई, दिल्लीनंतर आऱसीबी प्लेऑफमध्ये जाणारा तिसरा संघ आहे.

मॅक्सवेलचं पुन्हा दमदार अर्धशतक

सामन्यात बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने तो निर्णय सार्थ ठरवला. पडीक्कल आणि विराट कोहलीने संघाला 68 धावांची सलामी दिली. विराट कोहली 25 धावांवर बाद झाल्यानंतर पडीक्कलने धावफलक हलता ठेवला. 40 धावा करुन तोदेखील बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने (57) अर्धशतकी खेळी करत बँगलोरला दीडशतकी मजल मारुन दिली. एबी डिव्हिलियर्सने 23 धावांचं योगदान दिलं. पंजाबच्या गोलंदाजांनी या सामन्यात बरी गोलंदाजी केली. पंजाबकडून मोजेस हेनरिक्सने 4 षटकात अवघ्या 12 धावा देत 3 बळी घेतले. तर मोहम्मद शमीने 4 षटकात 39 धावा देत 3 बळी घेतली. शमीने तिन्ही बळी अखेरच्या षटकात मिळवले.

पंजाबची सुरुवात चांगली शेवट खराब

दरम्यान आरसीबीने दिलेले 166 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी पंजाबचे फलंदाज मैदानात उतरले. दरम्यान पंजाबची सुरुवात उत्तम झाली. सलामीवीर मयांक (57) आणि राहुल (39) यांच्यानंतर एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. मार्करने 20, शाहरुखने 16 आणि हेनरिक्स याने 12 धावा केल्या. याशिवाय इतराना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. याउलट दुसऱ्या भागाच्या मंध्यातरानंतर आरसीबने तुफान फलंदाजी केली. यामध्ये अनुभवी युझवेंद्र चहलने महत्त्वाच्या 3 विकेट्स विकेट्स घेतल्या. तर गार्टन आणि अहमदने प्रत्येकी एक विकेट घेतला. याशिवाय काही धावचीत विकेट्च्या मदतीने अखेर सामना आरसीबीने जिंकला. अखेरच्या षटकात पंजाबला 19 धावांची गरज होती. पण पंजाबचे फलंदाज 12 धावाच करु शकल्याने अखेर 6 धावांनी आरसीबीचा संघ विजयी झाला आहे.

हे ही वाचा

RCB vs PBKS: पंचाचा चूकीचा निर्णय, राहुल भडकला, दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो पंचाला तात्काळ बडतर्फ करा, वाचा नेमकं प्रकरण काय?

IPL 2021: अपना टाइम जल्दी आएगा… गोलंदाजीबाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा

IPL 2021 : कॅप्टन कूलने सांगितली राजस्थानविरुद्धच्या पराभवामागची कारणं, ऋतुराजबद्दल धोनीचं मोठं वक्तव्य

(Virat kohlis RCB Won Match Against Punjab kings with 6 Runs)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.