IPL 2021 : कॅप्टन कूलने सांगितली राजस्थानविरुद्धच्या पराभवामागची कारणं, ऋतुराजबद्दल धोनीचं मोठं वक्तव्य

चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 189 धावसंख्या उभारली होती, त्यामुळे अनेकांना, प्रामुख्याने चेन्नई समर्थकांना जवळपास खात्री होती की, हा सामना धोनीचे धुरंदर जिंकतील. मात्र संघाचा कर्णधार धोनीला असे वाटले नव्हते.

IPL 2021 : कॅप्टन कूलने सांगितली राजस्थानविरुद्धच्या पराभवामागची कारणं, ऋतुराजबद्दल धोनीचं मोठं वक्तव्य
MS Dhoni
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 1:30 PM

अबू धाबी : IPL 2021 स्पर्धेत शनिवारी अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 189 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी हा डोंगर अगदी सहजपणे सर केला. यशस्वी जयसवालची वादळी सुरुवात आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थाने 7 गडी आणि 15 चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पूर्ण केलं. (MS Dhoni reacts after loss against Rajasthan Royals, appreciates Ruturaj Gaikwad)

राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि एव्हिन लुईसने या सामन्यात वादळी सुरुवात केली. 5.2 षटकांमध्ये दोघांनी 77 धावांची सलामी दिली. लुईस 27 धावांवर बाद झाल्यानंतरही यशस्वी जयसवालने फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅससनने 28 धावांची खेळी केली. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिल्याचा शिवम दुबेने चांगलाच फायदा उचलला, जयसवाल बाद झाल्यानंतर त्याने जोरदार फटकेबाजी केली. दुबेने 42 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. दुबेने 4 चौकार आणि 4 षटकार फटकावले. चेन्नईचा शार्दुल ठाकूर व्यतिरिक्त उर्वरित सर्व गोलंदाज निष्प्रभ ठरले. त्याने 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. के. एम. आसिफने 2.1 षटकात 18 धावा देत एक बळी घेतला.

चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 189 धावसंख्या उभारली होती, त्यामुळे अनेकांना, प्रामुख्याने चेन्नई समर्थकांना जवळपास खात्री होती की, हा सामना धोनीचे धुरंदर जिंकतील. मात्र संघाचा कर्णधार धोनीला असे वाटले नव्हते. धोनीने सामना सुरु होण्यापूर्वीच खेळपट्टी ओळखली होती. ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीने फलंदाजांना तोडफोड करण्याचं लालच दाखवलं. त्यानुसार आक्रमक फटके खेळणाऱ्या फलंदाजांना खेळपट्टीने मदत केली. सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला की, ‘या सामन्यात नाणेफेक गमावणं हा सर्वात मोठा तोटा होता.’

धोनी म्हणाला, “मला राजस्थानच्या फलंदाजांना या विजयाचे पूर्ण श्रेय द्यायचे आहे. त्यांनी चमकदार फलंदाजी केली. राजस्थानसाठी आम्ही या खेळपट्टीवर 250 धावा करायला हव्या होत्या. धोनीने स्वतः हे सांगण्याचे कारणही दिले आणि हे कारण खेळपट्टीशी संबंधित होते. धोनी म्हणाला, “राजस्थानच्या फलंदाजीच्या वेळी खेळपट्टीवर दव पडले होते, ज्यामुळे चेंडू सहज बॅटवर येत होता आणि शॉट मारणे सोपे होते. पण, सुरुवातीला तसे नव्हते. सुरुवातीला चेंडू थांबून येत होता. धोनीला कदाचित खेळपट्टीचा मूड जाणवला असेल, त्यामुळे त्याने नाणेफेक गमावणे सर्वात मोठा तोटा असल्याचे सांगितले. दरम्यान, धोनीने राजस्थानच्या फलंदाजांचं कौतुक केलंच, सोबत त्याने ऋतुराज गायकवाडची पाठ थोपटली.

ऋतुराजची उत्कृष्ट खेळी

धोनीने शतकवीर ऋतुराज गायकवाडचे खूप कौतुक केले. तो म्हणाला, ‘जेव्हा त्यांचे मनगटी फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत होते, तेव्हा चेंडू थांबून येत होता. नंतर खेळपट्टी अजून चांगली झाली, त्यानंतर ऋतुराजने खरोखर खूपच चांगली फलंदाजी केली. अनेकदा जेव्हा तुम्ही सामने गमावता तेव्हा असे डाव लपले जातात, पण ती एक उत्तम खेळी होती.

आम्ही दीपकला मिस केलं

धोनीने कबूल केले की, त्याने वेगवान गोलंदाज दीपक चाहरला मिस केले. तो म्हणाला, मला वाटते की फलंदाजांना पटकन समजले पाहिजे की, चांगली धावसंख्या काय आहे. टी – 20 फॉरमॅटमध्ये अशा खेळपट्टीवर 160-180 ही धावसंख्या पुरेशी नाही. विरोधी संघाने पटकन परिस्थितीचे मूल्यांकन केले आणि मधल्या फळीवर दबाव येऊ दिला नाही. दीपक सामन्याच्या सुरुवातीला नवीन चेंडूने खरोखरच चांगली गोलंदाजी करतो. आज आम्ही त्याला मिस केलं, तसेच आज गोलंदाजांवर दबाव होता.

चेन्नईचा पहिला डाव

तत्पूर्वी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय चेन्नईच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीने 47 धावांची भागीदारी करत चेन्नईला चंगली सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या मोईन अली, सुरेश रैना आणि अंबाती रायुडूला फार चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र सलामीवीर ऋतुराज गायकवाडने राजस्थानच्या गोलंदाजांची यथेच्च धुलाई सुरुच ठेवली.

अखेरच्या काही षटकांमध्ये ऋतुराजला रवींद्र जाडेजाने चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 22 चेंडूत नाबात 55 धावांची भागीदारी रचली. या दरम्यान ऋतुराज गायकवाडने आयपीएल कारकिर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने 60 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. रवींद्र जाडेजानेदेखील 15 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी केली. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकांमध्ये 189 धावांचा डोंगर उभा केला.

इतर बातम्या

RR vs CSK : जयसवालचं वादळ, दुबेची फटकेबाजी, राजस्थानचा चेन्नईवर दिमाखदार विजय, प्लेऑफच्या आशा जिवंत

MI vs DC : मुंबईला धूळ चारत दिल्लीची प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री, रोहित अँड कंपनीचा मार्ग खडतर

विराट कोहलीनंतर भारताचं नेतृत्व कोणाकडे, डेल स्टेनचा ‘या’ चार खेळाडूंवर विश्वास

(MS Dhoni reacts after loss against Rajasthan Royals, appreciates Ruturaj Gaikwad)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.