AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीनंतर भारताचं नेतृत्व कोणाकडे, डेल स्टेनचा ‘या’ चार खेळाडूंवर विश्वास

जेव्हापासून विराट कोहलीने टी - 20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून त्याच्यानंतर त्याची जागा कोण घेणार? यावर चर्चा होणे सामान्य बाब आहे.

विराट कोहलीनंतर भारताचं नेतृत्व कोणाकडे, डेल स्टेनचा 'या' चार खेळाडूंवर विश्वास
Dale Steyn
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 8:19 PM
Share

मुंबई : जेव्हापासून विराट कोहलीने टी – 20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून त्याच्यानंतर त्याची जागा कोण घेणार? यावर चर्चा होणे सामान्य बाब आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान टी – 20 विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. यानंतर नवीन कर्णधाराची घोषणा केली जाईल. (Dale Steyn Picks Best Player to Replace Virat Kohli as Captain for India in T-20)

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने टी – 20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण या राईट हँड बॅटरने कामाच्या ताणामुळे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तथापि, तो एकदिवसीय आणि कसोटीमध्ये संघाचा कर्णधार राहील. पुढील कर्णधाराच्या शर्यतीत रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव अग्रस्थानी आहे, पण भारताचा पुढील कर्णधार निवडण्यासाठी भारताकडे बरेच पर्याय आहेत, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने म्हटले आहे. स्टेनने या शर्यतीत रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची नावेही घेतली आहेत. मात्र, त्याने पहिली पसंती रोहित शर्माला दिली आहे.

स्पोर्ट्स तकशी बोलताना स्टेन म्हणाला, “त्यांच्याकडे बरेच पर्याय आहेत. आपल्याला फक्त आयपीएलमध्ये पाहण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला बरेच खेळाडू दिसतील. त्यांच्याकडे सूर्यकुमार यादव आहे, मला वाटते की तो संघात असेल. त्यांच्याकडे रिषभ पंत हा एक चांगला पर्याय आहे, जो चांगले काम करत आहे, बरेच खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर आहे, रोहित शर्मा आहे. हे सर्व खळाडू चांगले काम करू शकतात, तुम्ही ही जबाबदारी कोणालाही द्यावी आणि त्यांना वेळ द्यावा. यामध्ये भारतीय संघ विलक्षण आहे. भारताने नेहमीच एका खेळाडूला दीर्घकाळ कर्णधारपद दिले आहे आणि त्याने हे काम चांगले केले आहे.

रोहित शानदार कामगिरी करु शकतो

स्टेनने टी – 20 मध्ये टीम इंडियाच्या पुढील कर्णधारापदासाठी बरीच नावे घेतली, पण त्याने असे म्हटले आहे की रोहित हे काम अधिक चांगल्या पद्धतीने करेल. कारण तो युवा खेळाडूंचा योग्य वापर करतो. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्वही केले आहे आणि निदाहास ट्रॉफी जिंकली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 19 पैकी 15 सामने जिंकले आहेत.

स्टेन म्हणाला, “त्यांच्याकडे निवडण्यासाठी बरेच खेळाडू आहेत. मला वाटते की, भारतासाठी आत्ता सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचे नवे खेळाडू जागतिक दर्जाचे आहेत. तुम्ही मोहम्मद सिराजकडे पाहा, रिषभ पंतकडे पाहा. हे युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार खेळ करत आहेत. त्यामुळे जर तुम्ही रोहितला कर्णधारपद दिलं तर तो योग्य निर्णय ठरेल, तो बऱ्याच काळापासून संघासोबत आहे. तसेच त्याने अनेक आयपीएल स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याला जर कर्णधार बनवले तर तो एक उत्तम निर्णय असेल.

इतर बातम्या

मंधानाचं शतक, भारतीय क्रिकेटपटू म्हणाली, ओ हसिना जुल्फोंवाली…., मग स्मृतीच्या उत्तराने बोलती बंद!

IPL 2021: मराठमोळ्या ऋतुराजसमोर फिके पडले सर्व फलंदाज, युएईत खास कामगिरी

IPL 2021: कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब 5 गडी राखून विजयी

(Dale Steyn Picks Best Player to Replace Virat Kohli as Captain for India in T-20)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.