IPL 2021: कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब 5 गडी राखून विजयी

पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेला रोमहर्षक सामना अखेर पंजाब किंग्सने 5 विकेट्सने खिशात घातला आहे. यावेळी कर्णधार केएल राहुलने अप्रतिम फलंदाजीचं दर्शन घडवत संघाला जिंकवून दिलं.

IPL 2021: कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब 5 गडी राखून विजयी
केएल राहुल

IPL 2021: पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (PBKS vs KKR) या दोन्ही संघात यंदाच्या आयपीएलमधील 45 वा सामना पार पडला. अत्यंत रोमहर्षक झालेला हा सामनाही शेवटच्या षटकापर्यंत गेला. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) एकहाती खिंड लढवत 67 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर पंजाबने केकेआरवर 5 गडी राखून विजय मिळवला आहे.

सामन्यात अत्यंत चुरशीच्या क्षणी फलंदाजीला आलेल्या युवा फलंदाज शाहरुख खानने (Shahrukh Khan) अप्रतिम खेळी केली. त्याने 9 चेंडूत नाबाद 22 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे अखेरच्या षटकात राहुल बाद झाला. त्यावेळी संघाला विजयासाठी 4 चेंडूत 4 धावांची गरज होती. तेव्हा शाहरुखने षटकार खेचून संघाला 5 विकेट्सनी सामना जिंकवून दिला.

व्यंकटेश अय्यर पुन्हा चमकला!

यंदाच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सचा X फॅक्टर ठरणारा व्यंकटेश अय्यर आजच्या सामन्यात पुन्हा चमकला आहे. सलामीला उतरलेल्या व्यंकटेशने धमाकेदार फलंदाजी करत आणखी एका अर्धशतकाची नोंद केली. अय्यरने 49 चेंडूत 9 चौकार आणि एक षटकार खेचत 67 धावांची दमदार खेळी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर केकेआरला चांगली सुरुवात मिळाली. ज्यानंतर मधल्या फळीतील राहुल त्रिपाठीच्या 34 आणि नितीश राणाच्या 31 धावांच्या जोरावर केकआरने 165 धावांपर्यंत मजल मारली. तर पंजाबकडून युवा अर्शदीपने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करत 3 बळी टीपले. त्यासोबत रवी बिश्नोईने 2 आणि मोहम्मद शमीने 1 बळी घेतला.

केएल राहुलची ‘कप्तानी खेळी’

दरम्यान केकेआरच्या 166 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाब संघाकडून कर्णधार केएल राहुलने आणि मयांकने उत्तम सुरुवात करुन दिली. पण मयांक 40 धावावंर बाद झाल्यानंतर राहुलने मात्र एकहाती खिंड लढवली. राहुलने 55 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार खेचत 67 धावा केल्या. तसेच मार्करम आणि पूरन यांनी अनुक्रमे 18 आणि 12 धावा केल्या. तर अखेरच्या षटकात राहुल बाद झाल्यानंतर षटकार खेचून सामना जिंकवून देणाऱ्या शाहरुख यानेही नाबाद 22 धावा करत सामना जिंकवून दिला. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने 2 तर, नारायण, अय्यर आणि मावी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे ही वाचा

IPL 2021: मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचेल का?, केकेआरकडे आहे उत्तर, वाचा नेमकं काय आहे गणित?

T20 World cup मध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे भारत पराभूत होणार, माजी पाकिस्तानी खेळाडूचा दावा

IND Women vs AUS Women : ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत पूनम राऊतच्या एका कृतीने जिंकली साऱ्यांची मनं, पाहा नेमकं काय घडलं?

(KL Rahul Great batting let PBKS won the Match Against KKR with 5 wickets remaining)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI