IPL 2021: मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचेल का?, केकेआरकडे आहे उत्तर, वाचा नेमकं काय आहे गणित?

इंडियन प्रिमीयर लीग आता हळू हळू अंतिम सामन्याच्या दिशेने आगेकुच करु लागली आहे. अवघ्या 15 दिवसांवर आयपीएलची फायनल येऊन ठेपली असताना प्लेऑफमधील केवळ एकच संघ समोर आला आहे.

IPL 2021: मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचेल का?, केकेआरकडे आहे उत्तर, वाचा नेमकं काय आहे गणित?
मुंबई इंडियन्स संघ
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 7:47 PM

IPL 2021: आयपीएलच्या 14 व्या पर्वातील प्लेऑफमध्ये खेळणारे 4 संघ आता एक एक करुन समोर येतील. यामध्ये सर्वात आधी बाजी मारत धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने प्लेऑफमध्ये हजेरी लावली आहे. दरम्यान आता उर्वरीत तीन संघ कोणते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात तब्बल 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकलेला मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians) यंदा प्लेऑफमध्ये पोहोचेल का? हा प्रश्न त्याच्या हजारो चाहत्यांना पडला आहे. पण अद्याप या प्रश्नाचं उत्तर समोर आलं नसून आगामी सामन्यात मुंबई आणि केकेआर (KKR) हे संघ कशी कामगिरी करतील. त्यावरुनच हे स्पष्ट होईल.

दुसऱ्या पर्वात सतत पराभूत होणाऱ्या मुंबईने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 6 विकेड्सने विजय मिळवला. ज्यामुळे आयपीएलमध्ये 11 पैकी 5 मॅच सामने जिंकत मुंबईच्या खात्यात 10 गुण जमा झाले आहेत. पण दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाने देखील 11 पैकी 5 मॅच सामने जिंकले आहेत. त्यात त्यांचा नेट रन रेट मुंबईपेक्षा अधिक असल्याने चौथ्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईपेक्षा अधिक पात्र आहेत.

केकेआरचा पराभव मुंबईसाठी फायद्याचा

दरम्यान उर्वरीत आयपीएलमघ्ये मुंबई आणि कोलकात्याचे आणखी 3 सामने शिल्लक आहेत. या तीन सामन्यात जोही  संघ अधिक सामने जिंकेल तो प्लेऑफमध्ये जाणार आहे. तर दोघांनी तिन्ही सामने जिंकले तर केकेआरचा नेट रनरेट अधिक असल्यामुळे त्यांची जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मुंबईची प्लेऑफमध्ये एन्ट्री होण्यासाठी केकेआर उर्वरीत सामन्यात अधिकदा पराभूत होणं गरजेचं आहे. तर मुंबईला विजय मिळवणं.

मुंबई इंडियन्सचे उर्वरीत सामने

– 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

कोलकाता नाइट रायडर्सचे उर्वरीत सामने

– 01 ऑक्टोबर (शुक्रवार): केकेआर vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): केकेआर vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 07 ऑक्टोबर (गुरुवार): केकेआर vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह

हे ही वाचा –

IPL 2021: केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाज स्पर्धेतून बाहेर, ‘हे’ आहे कारण

VIDEO : सचिनला ड्रेसिंगरुमध्ये पाहताच इशान किशन थबकला, पुढे जे केलं ते पाहाच

T20 World cup संघात ‘या’ खेळाडूला न घेणं भारताला महाग पडणार?, युएईमध्ये करतोय धमाल

(To let mumbai indians in Play offs kkr need to lost there remaining matches and mi shoul win it)

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.