IPL 2021: …म्हणून हार्दीक पंड्या गोलंदाजी करत नाही, मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक जयवर्धनेने सांगितलं कारण

मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सवर (MI vs PBKS) सहा गडी राखून विजय मिळवला. विशेष म्हणजे या सामन्यांत कुंग-फू पंड्या अर्थात हार्दीक पंड्याच्या (Hardik Pandya) धमाकेदार खेळीची झलक दिसली.

IPL 2021: ...म्हणून हार्दीक पंड्या गोलंदाजी करत नाही, मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक जयवर्धनेने सांगितलं कारण
हार्दीक पंड्या
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 5:14 PM

मुंबई: आयसीसी टी20 विश्वचषक (T20 World Cup) जसजसा जवळ येत आहे, तसं संघात निवडण्यात आलेल्या खेळाडूंच्या फॉर्मची चर्चाही जोर धरु लागली आहे. यामध्येच सर्वांना चिंता लागून असलेला एक खेळाडू म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दीक पंड्या (Hardik Pandya). दरम्यान मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर (MI vs PBKS) सहा गडी राखून विजय मिळवला. ज्या विजयात हार्दीकच्या धमाकेदार खेळीची झलक दिसली. त्याने 30 चेंडूत दमदार अशा नाबाद 40 धावा ठोकत सामना संपवला.

ज्यामुळे त्याचा फॉर्म परत येत असल्याची हमीतर मिळाली पण अष्टपैलू पंड्या अद्यापही गोलंदाजी करत नसल्याने त्यावर प्रश्न उठवले जात आहेत.दरम्यान मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा प्रशिक्षक महेला जर्यवर्धने (Mahela Jayawrdene) याने  याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पंड्याला सध्या गोलंदाजी करण्याकरता कोणतीच जबरदस्ती करण्यात येत नसल्याचं सांगत यामागील कारणही सांगितलं आहे.

टीम इंडियासाठी फलंदाजी महत्त्वाची

महेलाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत पंड्याच्या गोलंदाजीबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने सांगितलं, “हार्दिकने बऱ्याच काळापासून गोलंदाजी केलेली नाही. त्याच्या संपूर्ण खेळीवर आम्ही फार लक्ष देत आहोत. दरम्यान आगामी विश्वचषकात पंड्या चांगली कामगिरी करावा यासाठी त्याला कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती केली जात नसून संघासाठी सध्या त्याची फलंदाजी अधिक महत्त्वाची असल्याने त्याला गोलंदाजीसाठी फोर्स केला जात नाही.”

अन्यथा शार्दूलला संधी

हार्दीकने पंजाब विरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली. ज्यानंतर अनेक टीकाकारांची तोंड बंद झाली आहेत. पण आयपीएलच्या उर्वरीत सामन्यातही हार्दीकने अशीच कामगिरी करने महत्त्वाचे आहे. अन्यथा हार्दिकच्या जागी भारतीय संघात मुंबईच्या शार्दुल ठाकूरची एन्ट्री होऊ शकते. सध्या राखीव खेळाडूंत नाव असलेल्या शार्दूलला थेट अंतिम भारतीय संघात स्थान  मिळू शकतं. सध्या शार्दुल एकमेव भारतीय संघातील उत्तम वेगवान गोलंदाज आहे जो फलंदाजीही उत्तम करतो.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

टी 20 विश्वचषक

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत.

हे ही वाचा –

IPL 2021: केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाज स्पर्धेतून बाहेर, ‘हे’ आहे कारण

VIDEO : सचिनला ड्रेसिंगरुमध्ये पाहताच इशान किशन थबकला, पुढे जे केलं ते पाहाच

T20 World cup संघात ‘या’ खेळाडूला न घेणं भारताला महाग पडणार?, युएईमध्ये करतोय धमाल

(Mahela jayawardene says due to batting concentration they are not forcing hardik pandya to bowl)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.