5

IPL 2021: आरसीबीच्या दमदार विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये सर्व आनंदी, एबी डिव्हिलीयर्सने केली विराटची नकल, पाहा VIDEO

बलाढ्य मुंबई इंडियन्सचा संघ रविवारी आरसीबीच्या माऱ्यासमोर गारद पडला. कर्णधार रोहित शर्मा सोडता सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने मुंबईला 54 धावांनी पराभव चाखावा लागला होता.

IPL 2021: आरसीबीच्या दमदार विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये सर्व आनंदी, एबी डिव्हिलीयर्सने केली विराटची नकल, पाहा VIDEO
विराट कोहली
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 5:24 PM

IPL 2021: आयपीएलच्या (IPL) 39 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूने (RCB vs MI) दारुण पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने मुंबईवर 54 धावांनी दमदार विजय मिळवला. सुरुवातीला उत्तम फॉर्ममध्ये असलेली आऱसीबी पुन्हा मागे पडत असताना हा विजय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. दरम्यान या महत्त्वाच्या विजयानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, चहल असे सारेच खेळाडू कमालीचे खुश होते. सर्वांनी ड्रेसिंग रुममध्ये अक्षरश: धमाल केली.

ही धमाल करत असताना एबीने कर्णधार विराटची विकेट घेतल्यानंतरची नकल करत सर्वांचच लक्ष्य वेधून घेतलं. एबीचा हा व्हिडीओ सध्या चाहते पाहत असून या व्हिडिओमध्ये सर्व आरसीबीचा संघही एबीने केलेली कर्णधार विराटची नकल एन्जॉय करत आहेत. या व्हिडीओमध्ये हॅट्रिकवीर हर्षल पटेलही त्याचं मनोगत व्यक्त करत आहे. दरम्यान हा संपूर्ण व्हिडीओ आरसीबीने त्यांच्या युट्युबवर पोस्ट केला आहे…

असा मिळवला आरसीबीने विजय

सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने गोलंदाजी घेतली. पण आरसीबीचे फलंदाज धमाकेदार फलंदाजी करत असल्याने मुंबईला त्यांचा निर्णय़ चुकला असे वाटत होते. पण अखेरच्या षटकात मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी उत्तम बोलिंग करत आरसीबीला 165 धावांवर रोखलं. त्यानंतर मुंबईचे फलंदाज 166 धावा करुन सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरले. सुरुवातही दमदार झाली. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंंटन डिकॉक यांनी दमदार सुरुवातकेली. पण 57 धावांवर डिकॉक बाद झाला. ज्यानंतर कर्णधार रोहित एकाकी झुंज देत होता. पण रोहित नॉन स्ट्राईकवर असताना ईशान किशनचा बॉल त्याला लागला. ज्यानंतर पुढच्याच चेंडूवर रोहित बाद झाला. 43 धावा करुन रोहित बाद होताच एकामागोमाग एक फलंदाज बाद होतं गेले. पण अखेरच्या काही षटकात क्रिजवर हार्दीक आणि पोलार्ड हे धाकड खेळाडू होते. ज्यांच्यासाठी सामना जिंकवणं अवघड नव्हतं. पण त्याच क्षणी आरसीबीनं त्यांचा हुकमी एक्का काढला.

हर्षलचा भेदक मारा आणि मुंबई पराभूत

विजयासाठी मुंबईला 60 धावांची गरज असताना आरसीबीचा यंदाच्या हंगामातील मुख्य गोलंदाज हर्षल पटेलने चेंडू हातात घेतला. तो 17 वी ओव्हर टाकत होता. समोर हार्दीकसह पोलार्ड होता. सिक्सर किंग असणारे दोघेही सामना जिंकवण्याची ताकद मनगटात ठेवून होते. पण हर्षलने जबरदस्त अशा स्लो डिलेव्हरीज टाकत आधी हार्दीकला कर्णधार कोहलीच्या हाती झेलबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पोलार्डची दांडी उडवली. या दोघांच्या जाण्याने मुंबईच्या हातातून सामना जवळपास गेलाच होता. पण तिसऱ्या चेंडूवर हर्षलने राहुल चाहरला पायचीत करत अप्रतिम अशी हॅट्रिक नोंदवली. त्याच्या या हॅट्रिकमुळे आरसीबीला विजय सोपा झाला. पुढील काही शतकात मुंबईचे उर्वरीत फलंदाजही बाद झाले आणि आरसीबीने 54 धावांनी विजय नोंदवला.

हे ही वाचा

IPL 2021: बलाढ्य सीएसके संघाची कमकुवत बाजू कोणती?, वीरेंद्र सेहवागने सांगितली आतली माहिती

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा कसोटी क्रिकेटला रामराम, निवृत्तीबाबत म्हणाला…

IPL 2021 : हॅट्रिकदरम्यानचा ‘तो’ चेंडू सर्वोत्तम, हर्षल पटेलकडून फेव्हरेट विकेटचा खुलासा

(AB de Villiers mimics Virat Kohli After win over mumbai indians)

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू