AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs KKR: रवींद्र जाडेजा पुन्हा झळकला, एका ओव्हरमध्ये फिरवला सामना, चेन्नईचा केकेआरवर निसटता विजय

चेन्नई सुपरकिंग्सने उत्कंठावर्धक सामन्यात केकेआरचा विजयी रथ रोखला. पण हा सामना फिरवला तो रवींद्र जाडेजा या भारताच्या अव्वल क्रमाकांच्या अष्टपैलू खेळाडूने...

CSK vs KKR: रवींद्र जाडेजा पुन्हा झळकला, एका ओव्हरमध्ये फिरवला सामना, चेन्नईचा केकेआरवर निसटता विजय
रवींद्र जाडेजा षटकार ठोकताना
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 12:55 AM
Share

IPL 2021: आयपीएलचा दुसरा हंगाम नेहमीसारखाच चुरशीच्या सामन्यांनी खचाखच भरलेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील सामन्यत आयपीएलमधील चुरस काय असते? हे पुन्हा एकदा दिसून आले. अगदी उत्कंठार्धक झालेला हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. पण अखेरच्या चेंडूवर चेन्नईने विजय मिळवला. पण हा विजय मिळवण्यासाठी चेन्नईला शेवटची नाही तर 19 वी ओव्हर अत्यंत महत्त्वाची ठरली. ज्यामध्ये रवींद्र जाडेजाच्या (Ravindra jadeja) बॅटने केकेआरला पराभवाच्या दिशेने ढकललं.

रवींद्र जाडेजाने ही धमाकेदार फलंदाजी केकेआरचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याच्या ओव्हरला केली. केकेआरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण  राहुल त्रिपाठी (45) आणि नितीश राणा (37) यांच्याखेरीज कोणालाच खास फलंदाजी करता न आल्याने केकेआरने चेन्नईसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड (40) आणि फाफ डुप्लेसी (43) यांनी चेन्नईला उत्तम सुरुवात करुन दिली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अयशस्वी झाल्यानंतर 19 व्या षटकात मात्र असे काही घडले ज्याने सर्व सामनाच फिरवून टाकला.

जाडेजाची ‘सुपर-डुपर’ ओव्हर

रवींद्र जाडेजा 18 व्या ओव्हरमध्ये फलंदाजीला आला. तेव्हा चेन्नईला 17 चेंडूत 30 धावांची गरज होती. पण तेव्हाच धोनी बाद झाला. त्या ओव्हमध्ये केवळ 5 धावा चेन्नई करु शकली. त्यामुळे नंतर 12 चेंडूत 26 धावांची गरज चेन्नईला होती. त्याचवेळी जाडेजाने सुपर अवतार दाखवत धमाकेदार फलंदाजी केली. त्याने 8 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार खेचत 22 धावा केल्या. ज्यामुळे अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी केवळ चारच धावांची गरज उरली. दीपक चहरने अखेरची विजयी धाव घेत सामना जिंकवून दिला.

सामनावीराचा पुरस्कार खास लेकीसाठी

जाडेजाने केलेल्या या फलंदाजीसाठी तसेच गोलंदाजीत घेतलेल्या एका विकेटमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. दरम्यान आज कन्या दिन (Daughters day) असल्याने जाडेजाने आजचा सामनावीराचा पुरस्कार मुलगी निध्याना हीला समर्पित केला. त्याने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट करत याबद्दल माहिती दिली.

चेन्नई गुणतालिकेतही अव्वल

या अप्रतिम विजयासह धोनीच्या चेन्नई संघाने गुणतालिकेतही अव्वल स्थान गाठले आहे. त्यांनी 10 पैकी 8 सामने जिंकले आहेत. ज्यामुळे त्यांच्या खात्यात 16 गुण आले असून त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे.

CSK vs KKR: पायातून रक्त वाहत असतानाही नाही सोडलं मैदान, ‘या’ खेळाडूचे फोटो पाहून चाहतेही भावूक

IPL 2021: केकेआरचं विजयाचं स्वप्न भंगलं, अखेरच्या चेंडूवर पराभव, रंगतदार सामन्यात चेन्नई विजयी

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादचं नशिब बदलणार?, राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी जगातील उत्कृष्ट फलंदाज उतरणार मैदानात

(Ravindra Jadejas smashing over against Prasid Krishna let won CSK match againt KKR)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.