IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादचं नशिब बदलणार?, राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी जगातील उत्कृष्ट फलंदाज उतरणार मैदानात

यंदाचा सीजन सनरायजर्स हैद्राबाद संघासाठी अत्यंत निराशाजनक राहिला आहे. आधीच त्यांना एकामागोमाग एक सामन्यात पराभव मिळाल्यानंतर त्यांचा गोलंदाज टी नटराजनलाही कोरोनाची बाधा झाली होती.

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादचं नशिब बदलणार?, राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी जगातील उत्कृष्ट फलंदाज उतरणार मैदानात
सनरायजर्स हैद्राबादचा संघ
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 6:32 PM

मुंबई: सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघासाठी यंदाची आयपीएल 2021 (IPL 2021) अजिबात चांगली चाललेली नाही. दुसरं पर्व सुरु झाल्यानंतरही त्यांचा फॉर्म मात्र परत आलेला नाही. त्यामुळे 2016 सालीचा विजयी संघ हैद्राबाद यंदा 9 पैकी 8 सामने पराभूत झाला आहे. त्यामुळे गुणतालिकेतही सर्वात खालच्या स्थानी हैद्राबाद संघ आहे. दरम्यान आता त्यांच्या संघाती एक धाकड फलंदाज जो यंदाच्या पर्वात अजून खेळलेला नसून तो संघात परतण्याची शक्यता आहे. संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी याबाबतचा इशारा दिला आहे.

हा खेळाडू म्हणजे इंग्लंडचा धाकड फलंदाज जेसन रॉय (Jason Roy). नुकत्याच म्हणजे शनिवारी 25 सप्टेंबर रोजी शारजाहमध्ये झालेल्या सामन्यात हैद्राबादला अवघ्या 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतक पत्रकार परिषदेत कोच ट्रेवर बेलिस यांनी माहिती देताना सांगितलं, ”संघातील काही परदेशी फलंदाज जे अजून खेळलेले नाहीत. त्यांना लवकरच संघात स्थान देण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. पुढील सामन्यापूर्वी आमची बैठक देखील होणार आहे.” दरम्यान यातून ट्रेवर यांनी नाव न घेता जेसन रॉय लवकरच सामिल होईल. असा इशारा दिला.

टी नटराजनच्या जागीही नवीन खेळाडू दाखल

कोरोना महामारीने पुन्हा आयपीएलमध्ये शिरकाव केला सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आधीच गुणतालिकेत सर्वात खाली असणाऱ्या हैद्राबादची संकट आणखी वाढली होती. त्यामुळे त्यांनी एका नव्या खेळाडूला संघात सामिल केलं आहे. उम्रान मलिक (Umran Malik) असं या खेळाडूचं नाव असून तो टी नटराजनच्या जागी संघातून खेळणारा आहे. उम्रान हा जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक टी20 आणि लिस्ट A सामने खेळले असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतले आहेत. तो सध्या सनरायजर्स हैद्राबाद संघाचा नेट बोलर म्हणून खेळत असताना आता त्याला संघातही स्थान मिळालं आहे.

हैद्राबाद संघाचे उर्वरीत सामने

– 27 सप्टेंबर (सोमवार): हैद्राबाद vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 30 सप्टेंबर (गुरुवार): हैद्राबाद vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 03 ऑक्टोबर (रविवार): हैद्राबाद vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 06 ऑक्टोबर (बुधवार): हैद्राबाद vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): हैद्राबाद vs मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

हे ही वाचा

IPL 2021: वॉर्नर-विलियमसनला बाद करत मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

IND vs AUS : 26 वनडे सामन्यांपासूनचा ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखण्यात भारतीय संघ यशस्वी, झुलन, शेफाली, स्नेह राणा चमकल्या

IPL 2021: दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला दुप्पट मार, आधी पराभव, मग दंड, कप्तान संजूचं मोठं नुकसान

(Englands batter jason roy may play next match for Srh against rr)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.