IPL 2021: वॉर्नर-विलियमसनला बाद करत मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

मोहम्मद शमीने अवघ्या 5 चेंडूंमध्ये वॉर्नर-विल्यमसन या दोन्ही फलंदाजांच्या विकेट्स उडवल्या. आपला 150 वा सामना खेळणारा डेव्हिड वॉर्नर फक्त 2 धावा करून बाद झाला.

IPL 2021: वॉर्नर-विलियमसनला बाद करत मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, 'असा' पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

शारजाह : आयपीएल 2021 च्या 37 व्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादवर 5 धावांनी निसटता विजय मिळवला आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 125 धावा जमवल्या होत्या. पंजाबने दिलेलं 126 धावांचं आव्हन हैदराबादच्या फलंदाजांना पेलवेलं नाही. हैदराबादला निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या बदल्यात 120 धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी हा सामना पंजाबने 5 धावांनी जिंकला. तसेच पंजाबने या स्पर्धेतील त्यांचं आव्हानदेखील जिवंत ठेवलं आहे. (IPL 2021: 2 wickets in two overs! Mohammed Shami dismisses Warner, Williamson and becomes first bowler to do so)

पंजाबने हा सामना केवळ गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जिंकला. त्यातही त्यांचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीचा सिंहाचा वाटा आहे. पंजाब किंग्सने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 125 धावा केल्या होत्या. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य मिळाले. पण, या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. फक्त 10 धावांवर त्यांनी 2 महत्त्वाचे फलंदाज गमावले आणि, या दोन्ही विकेट त्यांच्या दोन सर्वात मोठ्या फलंदाजांच्या होत्या. या दोन्ही विकेट त्यांच्या माजी कर्णधार आणि सध्याच्या कर्णधाराच्या होत्या. या विकेट्स डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसनच्या होत्या.

वॉर्नर-विल्यमसनला बाद करुन शमी चमकला

मोहम्मद शमीने अवघ्या 5 चेंडूंमध्ये वॉर्नर-विल्यमसन या दोन्ही फलंदाजांच्या विकेट्स उडवल्या. आपला 150 वा सामना खेळणारा डेव्हिड वॉर्नर फक्त 2 धावा करून बाद झाला. तर कर्णधार केन विल्यमसन फक्त 1 धाव करून बाद झाला. शमीने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वॉर्नरला बाद केले, तर दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने केन विल्यमसनची विकेट उडवली. 5 चेंडूंच्या अंतराने या दोघांचा बंदोबस्त करून शमीने एक मोठा विक्रम केला. शमी आता आयपीएलच्या इतिहासातील पहिला असा गोलंदाज बनला आहे ज्याने वॉर्नर आणि विल्यमसनला सिंगल डिजीटवर बाद केलं आहे.

शमीकडून पहिल्यांदाच वॉर्नरची शिकार

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या आधी आयपीएलमध्ये शमीविरुद्ध डेव्हिड वॉर्नरचे रेकॉर्ड्स उत्कृष्ट होते. त्याने शमीविरोधात 65 चेंडूत 97 धावा चोपल्या आहेत. आयपीएलमध्ये शमीने वॉर्नरची विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. शमीने दिलेल्या या शानदार स्टार्टळे पंजाब किंग्जला कमी धावसंख्या करूनही सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. पहिल्या 3 षटकांत शमीने केवळ 5 धावा दिल्या. त्यात एका निर्धाव षटकाचाही समावेश आहे.

रिद्धीमान साहा-जेसन होल्डरचा संघर्ष

दरम्यान, या सामन्यात हैदराबादकडून जेसन होल्डर आणि सलामीवीर रिद्धीमान साहा व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. हैदराबादच्या फलंदाजांची हाराकिरी या सामन्यातील त्यांच्या पराभवामागचं प्रमुख कारण ठरली. मात्र या सामन्यात सुरुवातीला रिद्धीमान साहाने 31 धावांची खेळी करत संघर्ष केला. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना त्याने दुसरी बाजू लावून धरली होती. मात्र एक चुकीची धाव घेताना तो धावचित झाला. अखेरच्या काही षटकांमध्ये जेसन होल्डरने 5 षटकारांच्या मदतीने 29 चेंडूत 47 धावा चोपल्या, मात्र त्याला विजयश्री खेचून आणता आली नाही. होल्डर नाबाद राहिला.

पंजाबची टिच्चून गोलंदाजी

दुसऱ्या बाजूला पंजाबच्या गोलंदाजांनीदेखील टिच्चून गोलंदाजी केली. पंजाबकडून या सामन्यात रवी बिष्णोईने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर मोहम्मद शमीने 2 बळी घेतली. तर अर्शदीप सिंहला एक विकेट मिळाली.

पंजाबचा पहिला डावा

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांचीदेखील बिकट अवस्था पाहायला मिळाली. हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत पंजाबचा डाव अवघ्या 125 धावांमध्ये रोखला आहे. पंजाबकडून या डावात एडन मार्क्रमने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. तर कर्णधार के. एल. राहुलने 21 धावांचं योगदान दिलं. हैदराबादच्या गोलंदाजांनी या सामन्यात भेदक मारा केला. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 तर भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, राशिद खान आणि अब्दूल समद या चौघांनी प्रत्येक एक गडी बाद केला.

इतर बातम्या

रवीचंद्रन अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला!

माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया

IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी

(IPL 2021: 2 wickets in two overs! Mohammed Shami dismisses Warner, Williamson and becomes first bowler to do so)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI