PBKS vs SRH : पंजाबचा हैदराबादवर 5 धावांनी निसटता विजय, स्पर्धेतील आव्हान जिवंत

आयपीएल 2021 च्या 37 व्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादवर 5 धावांनी निसटता विजय मिळवला आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 125 धावा जमवल्या होत्या. पंजाबने दिलेलं 126 धावांचं आव्हन हैदराबादच्या फलंदाजांना पेलवेलं नाही.

PBKS vs SRH : पंजाबचा हैदराबादवर 5 धावांनी निसटता विजय, स्पर्धेतील आव्हान जिवंत

शारजाह : आयपीएल 2021 च्या 37 व्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादवर 5 धावांनी निसटता विजय मिळवला आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 125 धावा जमवल्या होत्या. पंजाबने दिलेलं 126 धावांचं आव्हन हैदराबादच्या फलंदाजांना पेलवेलं नाही. हैदराबादला निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या बदल्यात 120 धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी हा सामना पंजाबने 5 धावांनी जिंकला. तसेच पंजाबने या स्पर्धेतील त्यांचं आव्हानदेखील जिवंत ठेवलं आहे. (IPL 2021 : Punjab Kings defeated Sunrisers Hyderabad by 5 runs)

126 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरुवात अत्यंत वाईट झाली. पहिल्याच षटकात अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर 2 धावांवर बाद झाल्या त्यापाठोपाठ कर्णधार केन विलियमसनदेखील एक धाव करुन बाद झाला. या सामन्यात हैदराबादकडून जेसन होल्डर आणि सलामीवीर रिद्धीमान साहा व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. हैदराबादच्या फलंदाजांची हाराकिरी या सामन्यातील त्यांच्या पराभवामागचं प्रमुख कारण ठरली.

रिद्धीमान साहा-जेसन होल्डरचा संघर्ष

मात्र या सामन्यात सुरुवातीला रिद्धीमान साहाने 31 धावांची खेळी करत संघर्ष केला. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना त्याने दुसरी बाजू लावून धरली होती. मात्र एक चुकीची धाव घेताना तो धावचित झाला. अखेरच्या काही षटकांमध्ये जेसन होल्डरने 5 षटकारांच्या मदतीने 29 चेंडूत 47 धावा चोपल्या, मात्र त्याला विजयश्री खेचून आणता आली नाही. होल्डर नाबाद राहिला

पंजाबची टिच्चून गोलंदाजी

दुसऱ्या बाजूला पंजाबच्या गोलंदाजांनीदेखील टिच्चून गोलंदाजी केली. पंजाबकडून या सामन्यात रवी बिष्णोईने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर मोहम्मद शमीने 2 बळी घेतली. तर अर्शदीप सिंहला एक विकेट मिळाली.

पंजाबचा पहिला डावा

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांचीदेखील बिकट अवस्था पाहायला मिळाली. हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत पंजाबचा डाव अवघ्या 125 धावांमध्ये रोखला आहे. पंजाबकडून या डावात एडन मार्क्रमने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. तर कर्णधार के. एल. राहुलने 21 धावांचं योगदान दिलं. हैदराबादच्या गोलंदाजांनी या सामन्यात भेदक मारा केला. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 तर भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, राशिद खान आणि अब्दूल समद या चौघांनी प्रत्येक एक गडी बाद केला.

इतर बातम्या

रवीचंद्रन अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला!

माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया

IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी

(IPL 2021 : Punjab Kings defeated Sunrisers Hyderabad by 5 runs)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI