CSK vs KKR Live Score, IPL 2021 : रंगतदार सामन्यात केकेआर पराभूत, चेन्नई सुपरकिंग्जचा दोन गडी राखून विजय

| Updated on: Sep 26, 2021 | 9:27 PM

CSK vs KKR Live Score in Marathi: गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा मुकाबला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानवर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सशी होत आहे. हा सामना जिंकून प्ले ऑफचं तिकीट मिळवण्याचं प्लॅनिंग धोनीच्या चेन्नईने केलेलं असणार आहे.

CSK vs KKR Live Score, IPL 2021 : रंगतदार सामन्यात केकेआर पराभूत, चेन्नई सुपरकिंग्जचा दोन गडी राखून विजय

आयपीएल 2021 चा 38 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवला गेला. चेन्नई सुपर किंग्ज आणि केकेआर या दोन्ही संघांनी दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही सामने जिंकले होते. त्यामुळे आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. सामन्यात नाणफेक जिंकत केकेआरने फलंदाजी निवडली. पण मागील काही सामने उत्तम कामगिरी करणारे सलामीवीर गिल आणि अय्यर आज खास कामगिरी करु शकले नाही. राहुल त्रिपाठी (45) आणि नितीश राणा (37) यांच्याशिवाय इतर फलंदाज अधिक धावा करु शकले नाहीत. पण अखेरच्या काही चेंडूत दिनेशने 11 चेंडूमध्ये केलेले 26 रनही केकेआरला महत्त्वाचे ठरले असून चेन्नईसमोर 172 धावांचे लक्ष्य होते. चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज (40) आणि डुप्लेसी (43) यांनी उत्तम सुरुवात करुन दिली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अयशस्वी झाल्यानंतर  19 व्या षटकात जाडेजाने दोन षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईच्या पारड्यात सामना आणून ठेवला. पण अखेरची ओव्हर सुनील नारायणने अप्रतिम टाकत दोन विकेट्सही घेतल्या. ज्यानंतर शेवटच्या एका चेंडूवर चेन्नईला एक धाव गरजेची असताना दीपक चाहरने ती घेत संघाला विजय मिळवून दिला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Sep 2021 07:28 PM (IST)

    चेन्नई दोन विकेट्सनी विजयी

    अखेरच्या चेंडूवर चेन्नईला एक धाव गरजेची असताना दीपक चाहरने ती घेत संघाला विजय मिळवून दिला आहे.

  • 26 Sep 2021 07:22 PM (IST)

    सॅम करन बाद

    अखेरच्या षटकात विजयासाठी सीएसकेला 4 धावांची गरज असताना नारायणने सॅम करनला बाद केलं आहे.

  • 26 Sep 2021 07:11 PM (IST)

    चक्रवर्तीच्या चक्रीत अडकले धोनी रैना

    धोनी आणि रैना दोघांना एकाच षटकात वरुण चक्रवर्तीने बाद करत सामना अगदी रंगतदार स्थितीत आणून ठेवला आहे.

  • 26 Sep 2021 06:49 PM (IST)

    रायडू त्रिफळाचित

    अंबाती रायडूला बाद करण्यात केकेआरला य़श आलं आहे. सुनिल नारायणने त्याला त्रिफळाचित केलं आहे.

  • 26 Sep 2021 06:38 PM (IST)

    फाफचं अर्धशतक हुकलं.

    ऋतुराज गायकवाडनंतर सलामीवीर फाफ डुप्लेसीस देखील बाद झाला आहे. अवघ्या 7 धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं आहे.

  • 26 Sep 2021 06:15 PM (IST)

    ऋतुराज गायकवाड बाद

    सलामीला येत तुफान फलंदाजी करणारा ऋतुराज 40 धावा करुन बाद झाला आहे. रस्सेलच्या चेंडूवर मॉर्गनने त्याचा झेल घेतला आहे.

  • 26 Sep 2021 05:58 PM (IST)

    चेन्नईच्या सलामीवीरांची धाकड सुरुवात

    यंदाचं संपूर्ण पर्व सीएसकेला धमाकेदार सुरुवात करुन देणारे सलामीवर फाफ आणि ऋतुराज यांनी आजही केकेआरविरुद्ध उत्तम फलंदाजीला सुरुवात केली आहे. 5 ओव्हरनंतर सीएसकेचा स्कोर एकही विकेट न जाता 42 इतका होता.

  • 26 Sep 2021 05:25 PM (IST)

    चेन्नईसमोर 172 धावांचे लक्ष्य

    रस्सेल बाद होताच फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकने तडाखेबाज फलंदाजी केली. त्याने 11 चेंडूत 26 धावा ठोकल्या ज्यामुळे केकेआरने चेन्नईला 172 धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • 26 Sep 2021 05:03 PM (IST)

    रस्सेल 20 धावा करुन बाद

    आंद्रे रस्सेल बाद झाल्यामुळे केकेआरला मोठा झटका बसला आहे. शार्दूल ठाकूरने त्याला बाद केलं आहे.

  • 26 Sep 2021 04:53 PM (IST)

    रस्सेल, राणा जोडीने सांभाळला डाव

    चार गडी बाद झाल्यानंतर सध्या केकेआरचा फलंदाज नितीश राणा आणि आंद्रे रस्सेल सावध खेळी करत डाव सावरत आहेत.

  • 26 Sep 2021 04:41 PM (IST)

    कोलकात्याचा चौथा गडी माघारी, राहुल त्रिपाठी 45 धावांवर बाद

    कोलकात्याने महत्त्वाची विकेट गमावली आहे. रवींद्र जाडेजाने राहुल त्रिपाठीला 45 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (कोलकाता 89/4)

  • 26 Sep 2021 04:25 PM (IST)

    कोलकात्याला तिसरा झटका, कर्णधार मॉर्गन 8 धावांवर बाद

    कोलकात्याने तिसरी विकेट गमावली आहे. जोश हेजलवूडने कर्णधार ओईन मॉर्गनला 8 धावांवर असताना फॅफ डुप्लेसीकरवी झेलबाद केलं. (कोलकाता 70/3)

  • 26 Sep 2021 04:06 PM (IST)

    कोलकात्याला दुसरा झटका, वेंकटेश अय्यर 18 धावांवर बाद

    कोलकात्याने दुसरी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकूरने वेंकटेश अय्यरला 18 धावांवर असताना यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीकरवी झेलबाद केलं.

  • 26 Sep 2021 03:38 PM (IST)

    पहिल्याच षटकात कोलकात्याला मोठा झटका, शुभमन गिल 9 धावांवर बाद

    कोलकात्याने पहिल्याच षटकात पहिली विकेट गमावली आहे. अंबाती रायुडूने शुभमन गिलला (9) धावचित केलं. (कोलकाता 10/1)

  • 26 Sep 2021 03:25 PM (IST)

    नाणेफक जिंकून कोलकात्याचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

    कोलकात्याचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - Sep 26,2021 3:22 PM

Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.