CSK vs KKR: पायातून रक्त वाहत असतानाही नाही सोडलं मैदान, ‘या’ खेळाडूचे फोटो पाहून चाहतेही भावूक

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात चेन्नई संघाने केकेआरवर केवळ दोन गडी राखून विजय मिळवला. पण या सामन्यात एका चेन्नईच्या खेळाडूने सर्वांचीच मनं जिंकली.

CSK vs KKR: पायातून रक्त वाहत असतानाही नाही सोडलं मैदान, 'या' खेळाडूचे फोटो पाहून चाहतेही भावूक
फाफ डुप्लेसीस
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 9:14 PM

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) सामना अत्यंत उत्कंठावर्धक झाला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंचत सामना गेला होता. पण अखेर चेन्नईच केकआरवर भारी पडली. दोन गडी राखून चेन्नईने विजय मिळवला. पण या सामन्यादरम्यान एका चेन्नईच्या खेळाडूने मात्र साऱ्यांचीच मनं जिंकली. गुढघ्यातून रक्त येत असतानाही अप्रतिम क्षेत्ररक्षण करणाऱ्या या खेळाडूने नंतर फलंदाजीतही जबरदस्त खेळी केली. ज्यामुळे सामन्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होती.

तर हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा धाकड फलंदाज आणि चेन्नईचा सलामीवीर फाफ डुप्लेसीस (Faf du plessis). सामन्यात केकेआरचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना एक झेल घेण्यासाठी फाफने उत्तम प्रयत्न केला त्याचवेळी त्याच्या पायाला थोडी दुखापत झाली. त्यामुळे तो उपचारासाठी मैदानाबाहेरही गेला. पण काही वेळातच पुन्हा क्षेत्ररक्षणाला येत फाफने एक उत्तम झेल देखील टीपला. पण पुन्हा आलेल्या फाफच्या गुडघ्यातून रक्त येत होते. त्याच्या जर्सीतून हे रक्त स्पष्टपणे दिसून येत होतं. पण असे असतानाही तो मैदानाबाहेर न जाता क्षेत्ररक्षण करत होता. विशेष म्हणजे डाव संपताच फलंदाजीला देखील फाफ सलामीला आला आणि त्याने दमदार 43 धावा झळकावल्या. तो आजच्या सामन्यात चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. अनेक फॅन्सनी फाफचे फोटो टाकत त्याच्या अप्रतिम खेळीचं कौतुक केलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या ट्विटरवर देखील त्यांनी फाफचं कौतुक केलं आहे.

विशेष म्हणजे चेन्नईचा माजी सलामीवीर आणि ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज शेन वॉटसन (Shane Watson) हा देखील चेन्नईकडून खेळत असताना एका सामन्यात अशाच प्रकारे खेळला होता. त्याच्या गुडघ्यातून रक्त येत असतानाही त्याने अप्रतिम फलंदाजी केली होती. त्याचेही फोटो शेअर करत चेन्नईचे चाहते दोघांचा उदो उदो करत आहेत.

चुरशीच्या षटकात चेन्नई विजयी

केकेआरने चेन्नईसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या चेन्नईकडूनसलामीवीर ऋतुराज गायकवाड (40) आणि फाफ डुप्लेसी (43) यांनी चेन्नईला उत्तम सुरुवात केली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अयशस्वी झाल्यानंतर 19 व्या षटकात जाडेजाने दोन षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईच्या पारड्यात सामना आणून ठेवला. पण अखेरची ओव्हर सुनील नारायणने अप्रतिम टाकत दोन विकेट्सही घेतल्या. ज्यानंतर शेवटच्या एका चेंडूवर चेन्नईला एक धाव गरजेची असताना दीपक चाहरने ती घेत संघाला विजय मिळवून दिला.

हे ही वाचा

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादचं नशिब बदलणार?, राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी जगातील उत्कृष्ट फलंदाज उतरणार मैदानात

IPL 2021: वॉर्नर-विलियमसनला बाद करत मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

IPL 2021: केकेआरचं विजयाचं स्वप्न भंगलं, अखेरच्या चेंडूवर पराभव, रंगतदार सामन्यात चेन्नई विजयी

(CSKs Faf du Plessis Didnt leave ground even after his knee is bleeding at CSK vs KKR match)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.