इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा कसोटी क्रिकेटला रामराम, निवृत्तीबाबत म्हणाला…

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.

1/5
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे. मोईन अलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीची बातमी 26 सप्टेंबरच्या रात्री आली होती, पण त्यानंतर ते लवकरच याची घोषणा करतील असे सांगण्यात आले. आयपीएल 2021 मध्ये सध्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असलेल्या मोईन अलीने आपल्या निवृत्तीबद्दल माहिती देताना सांगितले की, तो 34 वर्षांचा आहेत आणि त्याला अजून अनेक वर्ष क्रिकेट खेळायचं आहे. तो म्हणाला की, कसोटी क्रिकेट महान आहे, पण हे क्रिकेट खेळणं खूप कठीण आहे.

2/5
इंग्लंडसाठी 64 कसोटी सामने खेळणारा 34 वर्षीय मोईन अली कसोटी संघात सतत आत-बाहेर राहिला आहे. 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण करणाऱ्या मोईनने 111 डावांमध्ये 28.29 च्या सरासरीने 2914 धावा केल्या असून त्यात 5 शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 36.66 च्या सरासरीने एकूण 195 विकेट्सदेखील घेतल्या आहेत. त्याने एका डावात पाच वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

3/5
2019 च्या अॅशेस मालिकेनंतर तो कसोटी क्रिकेट खेळला नव्हता पण अलीकडेच भारताविरुद्धच्या इंग्लंडच्या घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या मालिकेत त्याने कसोटी संघात पुनरागमन केले होते. अहवालांनुसार, तो बराच काळ कुटुंबापासून दूर राहत नाही, त्याला ते शक्य होत नाही. अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच त्याने कसोटी क्रिकेट न खेळण्याचे ठरवले होते. त्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने कोरोना प्रोटोकॉल शेअर करण्यापूर्वीच कसोटी क्रिकेटपासून सन्यास घेण्याचे जाहीर केले आहे. कोरोना संसर्गामुळे भारताविरुद्ध पाचवा कसोटी रद्द होण्यापूर्वी तो 3000 कसोटी धावा आणि 200 विकेट्स पूर्ण करणारा 15 वा कसोटी क्रिकेटपटू बनण्याच्या मार्गावर होता.

4/5
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती देताना मोईन अली आपल्या निवेदनात म्हणाला, "कसोटी क्रिकेट खूप चांगले आहे. जेव्हा तुमचे दिवस चांगले असतात, तेव्हा क्रिकेटचा हा फॉरमॅट इतर कोणत्याही स्वरूपापेक्षा बेस्ट असतो. मी कसोटी क्रिकेटचा खूप आनंद घेतला आहे, पण कधीकधी ती इंटेन्सिटी खूप जास्त असते, मला वाटते की मी खूप खेळलो आहे आणि जे आहे त्यात मी आनंदी आहे."

5/5
मोईन अलीने 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओव्हल कसोटीत हॅटट्रिकही घेतली होती. निवृत्तीनंतर ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना मोईन म्हणाला की, कसोटी संघातून वगळल्यानंतर आणि पुन्हा कॉन्ट्रॅक्ट  न मिळाल्याने 2019 मध्ये तो पार खचून गेला होता. यानंतर त्याने फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला. मात्र, त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मोईन म्हणाला की, त्याला फलंदाजीत प्रोमोटे केले ​​असते तर बरे झाले असते. खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी वापर करुन नुकसान केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI