AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Women vs AUS Women : ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत पूनम राऊतच्या एका कृतीने जिंकली साऱ्यांची मनं, पाहा नेमकं काय घडलं?

भारतीय महिला (Indian Women) आणि ऑस्ट्रेलियन महिला (Australia Women) क्रिकेट संघ यांच्यात खेळवल्या जात असलेल्या एकमेव डे-नाईट कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली.

IND Women vs AUS Women : ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत पूनम राऊतच्या एका कृतीने जिंकली साऱ्यांची मनं, पाहा नेमकं काय घडलं?
स्मृती मानधना आणि पूनम राऊत
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 8:53 PM
Share

कॅनबरा : भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women) सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर आता एकमेव कसोटीमध्ये भारतीय महिलांनी उत्तम सुरुवात केली आहे. सध्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे लवकर थांबवण्यात आला असून आतापर्यंत भारतीय संघाने पाच विकेट्सच्या बदल्यात 276 धावा केल्या होत्या. सामन्य़ात सलामीवीर स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) ऐतिहासिक शतकासह आणखी सुंदर गोष्ट घडली. दरम्यान भारताची फलंदाज पूनम राऊत (Punam Raut) हीने तिच्या एका कृतीमुळे भारतीयांचीच नाही तर प्रतिस्पर्धी संघाची मनही जिंकली आहेत.

दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीपासून एकाबाजूने स्मृतीने उत्तम फलंदाजी सुरु ठेवली असता दुसऱ्या बाजूने पूनमने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाना जेरीस आणलं होतं. पूनम 165 चेंडूत 36 धावा करुन बाद झाली. खरी पण बाद होण्या तिने केलेली कृती सर्वांच्याच मनात घर करुन गेली. भारतीय संघ 81 वी ओव्हर खेळत होता. सॉफी मोलीन्यूक्स ही ओव्हर टाकत असताना एक बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू पूनमने खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू यष्टीरक्षकाच्या थेट हातात गेला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अपील केली. पंचानी नॉट आऊटचा निर्णय दिला. दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू रिय्व्हूय घेतील, त्याच्याआधीच पूनम तंबूकडे चालू लागली. हे पाहून सर्वच हैराण झाले. ज्यानंतर पूनमच्या प्रमाणिकपणाची चर्चा ऑस्ट्रेलियापासून ते भारतापर्यंत सर्व क्रिकेट जगतात होत आहे.

दुसऱ्या दिवशीही पाऊस

पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशीही पावसाने खोडा घातला. खेळ थांबवल्यानंतर खेळपट्टी झाकण्यात आली आणि खेळाडूंनीही मैदान सोडले. हवामान खात्याने यावेळी वादळाचा अंदाज वर्तवला होता आणि लवकरच पाऊस सुरू झाला. दुसऱ्या सत्रात भारताने दोन गडी गमावले, ज्यात कर्णधार मिताली राज (30) आणि नवोदित यास्तिका भाटिया (19) यांच्या विकेट्सचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या सोफी मॉलिनेक्सने आतापर्यंत दोन विकेट्स घेतल्या आहेत. अॅशले गार्डनर आणि पेरी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.

चौकारांची बरसात, स्मृती मानधनाचं पहिलं कसोटी शतक

भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने गोल्ड कॉस्टवर खेळवल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind vs Aus) ऐतिहासिक शतक झळकावले आहे. भारतीय महिला संघ प्रथमच डे-नाईट कसोटी सामना खेळत आहे आणि मानधनाने तिच्या शतकासह हा सामना संस्मरणीय बनवला आहे. मानधनाच्या कारकिर्दीतील हे पहिले कसोटी शतक आहे. तिने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. स्मृती मानधनाच्या कारकिर्दीतील हा चौथा कसोटी सामना होता. या सामन्यात तिने शानदार शतक झळकावले. यापूर्वी, कसोटीत तिची सर्वोत्तम धावसंख्या 78 होती, जी तिने या वर्षी इंग्लंडविरुद्ध केली होती.

आपल्या कारकिर्दीतील चौथा कसोटी सामना खेळताना मानधनाने 170 चेंडूत 100 धावांचा टप्पा गाठला. या शतकी खेळीत तिने 18 चौकारही लगावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, भारतीय डावातील 51.5 षटकात, तिने एलिस पेरीच्या चेंडूवर मिडविकेटवर चौकार मारून आपले ऐतिहासिक शतक पूर्ण केले. सलामीवीर म्हणून शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला कसोटी खेळाडू ठरली आहे.

मानधनाने 52 व्या षटकात एलिस पेरीला पूल शॉट मारून आपले शतक पूर्ण केले. मानधानालाही सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोठं जीवदान मिळालं. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या षटकात ती पेरीच्या चेंडूवर झेलबाद झाली. मात्र, गोलंदाज पेरीचा पाय रेषेच्या पुढे असल्याने पंचांनी नो बॉल दिला. अखेर अॅशले गार्डनर हिने मानधनाची शतकी खेळी संपुष्टात आणली. गार्डनर मानधनाला ताहिला मॅक्ग्राथकरवी झेलबाद केलं. मानधनाने 216 चेंडूत 127 धावांची खेळी केली. यात 22 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

हे ही वाचा

IPL 2021: मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचेल का?, केकेआरकडे आहे उत्तर, वाचा नेमकं काय आहे गणित?

ऑक्टोबरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम, आधी IPL मग T-20 वर्ल्डकपचा थरार, ‘या’ तारखा लॉक करुन ठेवा

धोनीचा स्टेडियमबाहेर उत्तुंग षटकार पाहून साक्षी-झिवाचा जल्लोष, पाहा धोनीची खास ‘Family Moment’

(IND Women vs Aus Women Test match 2nd day Indias Punam Raut walks off even umpire gave not out Shows sportsmanship)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.