AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs SRH Live Score, IPL 2021 : गिलचं दमदार अर्धशतक, चुरशीच्या सामन्यात केकेआर सहा विकेट्सनी विजयी

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 11:14 PM
Share

KKR vs SRH Live Score in Marathi: सनरायजर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी केकेआरसाठी आजचा विजय अधिक महत्त्वाचा आहे. हैद्राबादचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे.

KKR vs SRH Live Score, IPL 2021 : गिलचं दमदार अर्धशतक, चुरशीच्या सामन्यात केकेआर सहा विकेट्सनी विजयी
केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद

इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील 49 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराजर्स हैद्राबाद या संघामध्ये खेळवला गेला. सामन्यात नाणेफेक जिंकत हैद्राबाद संघाने प्रथम फलंदाजी निवडली. पण हैद्राबादसाठी हा निर्णय़ चूकीचा ठरला. संघातील एकाही फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. ज्यामुळे संघ केवळ 115 धावाच करु शकला. संपूर्ण संघात सर्वाधिक धावा विल्यमसन (26), गार्ग (21) आणि अब्दुल समाद (25) यांनी केल्या. याखेरीज इतरांना 10 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. सध्या केकेआरचे फलंदाज 116 धावांचे सोपे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात आले. केकेआरकडून सलामीवीर शुभमनने दमदार अर्धशतक (57) ठोकलं. तर राणाने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेर कार्तिकने 18 महत्त्वपूर्ण धावा करत सामना केकेआऱला 6 विकेट्नसनी जिंकवून दिला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Oct 2021 11:00 PM (IST)

    KKR vs SRH : केकेआरचा अखेरच्या षटकात विजय

    116 धावांचे सोपे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात आले. केकेआरकडून सलामीवीर शुभमनने दमदार अर्धशतक (57) ठोकलं. तर राणाने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेर कार्तिकने 18 महत्त्वपूर्ण धावा करत सामना केकेआऱला 6 विकेट्नसनी जिंकवून दिला.

  • 03 Oct 2021 10:55 PM (IST)

    KKR vs SRH : गिल-राणा बाद, पण सामना केकेआरच्या बाजूने

    होल्डर आणि सिद्धार्थ कौल यांनी राणा आणि गिलला बाद केलं असलं तरी सामना केकेआरच्या दिशेने होत आहे.

  • 03 Oct 2021 10:25 PM (IST)

    KKR vs SRH : गिल-राणा जोडी मैदानात

    केकेआरचा डाव सांभाळण्यासाठी नितीश राणा आणि शुभमन गिल हे दोघे टिकून खेळत आहेत.

  • 03 Oct 2021 09:56 PM (IST)

    KKR vs SRH : अय्यरपाठोपाठ त्रिपाठीही बाद

    मागील काही सामने दमदार कामगिरी केलेले केकेआरचे युवा फलंदाज अय्यर आणि राहुल त्रिपाठी दोघेबी एका पाठोपाठ बाद झाले आहेत. त्रिपाठीची विकेट राशिद खानने घेतली आहे.

  • 03 Oct 2021 09:48 PM (IST)

    KKR vs SRH : अय्यर स्वस्तात माघारी

    मागील काही सामने तुफान फलंदाजी करणारा व्यंकटेश अय्यर आज स्वस्तात माघारी परतला आहे. 8 धावांवर खेळत असताना जेसन होल्डरने त्याची विकेट मिळवली आहे.

  • 03 Oct 2021 09:25 PM (IST)

    KKR vs SRH : केकेआरच्या फलंदाजीला सुरुवात

    केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर मैदानात उतरले आहेत.

  • 03 Oct 2021 09:13 PM (IST)

    KKR vs SRH : हैद्राबादची 116 धावांपर्यंच मजल

    हैद्राबादचे सर्व फलंदाज आज फेल झाल्याने संघ केवळ 115 धावाच करु शकला आहे. त्यामुळे केकेआरसमोर 116 धावांचे सोपे आव्हान आहे.

  • 03 Oct 2021 09:01 PM (IST)

    KKR vs SRH : शिवमने टीपली राशिदची विकेट

    हैद्राबादचा राशिद खानही बाद झाला आहे. शिवम मावीच्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरने त्याची कॅच घेतली आहे.

  • 03 Oct 2021 08:53 PM (IST)

    KKR vs SRH : हैद्राबादची आणखी एक विकेट पडली

    हैद्राबादचा अब्दुल समादही बाद झाला आहे. अवघ्या 100 धावांच्या आतच सातवा गडी तंबूत परतला आहे.

  • 03 Oct 2021 08:50 PM (IST)

    KKR vs SRH : हैद्राबादचा सहावा गडीही बाद

    हैद्राबादची सहावा गडी जेसन होल्डरच्या रुपात बाद झाला आहे.चक्रवर्तीनेच त्याचाही विकेट घेतला आहे.

  • 03 Oct 2021 08:43 PM (IST)

    KKR vs SRH : प्रियम गार्गही बाद

    हैद्राबादचा डाव सांभाळत असलेला युवा फलंदाज प्रियम गार्गही 21 धावा करुन बाद झाला आहे. चक्रवर्तीच्या चेंडूवर राहुलने त्याचा झेल घेतला आहे.

  • 03 Oct 2021 08:24 PM (IST)

    KKR vs SRH : हैद्राबादचा चौथा गडीही बाद

    हैद्राबाद संघाचा चौथा गडीही तंबूत परतला आहे. अभिषेक शर्माही 6 धावा करुन बाद झाला आहे.

  • 03 Oct 2021 08:10 PM (IST)

    KKR vs SRH : हैद्राबादचा कर्णधार केन विल्यमसन बाद

    हैद्राबाद संघाचे फलंदाज बाद होत असताना त्यांच्यासाठी मोठी आशा असणारा केन विल्यमसनही बाद झाला आहे. शाकिब अल हसनने त्याला धावचीत केलं आहे.

  • 03 Oct 2021 07:52 PM (IST)

    KKR vs SRH : जेसन रॉयही बाद

    हैद्राबाद संघाचा दुसरा सलीमीवीरही बाद झाला आहे. शिवम मावीच्या चेंडूवर साऊदीने जेसन रॉयची कॅच घेत त्याला तंबूत धाडलं आहे.

  • 03 Oct 2021 07:37 PM (IST)

    KKR vs SRH : हैद्राबादचा सलामीवीर बाद

    सनरायजर्स हैद्राबाद संघाला दुसऱ्याच चेंडूवर मोठा झटका बसला आहे. त्यांचा सलामीवीर रिद्धिमान साहा याला केकेआरच्या साऊदीने क्लिन बोल्ड केलं आहे.

  • 03 Oct 2021 07:11 PM (IST)

    SRH अंतिम 11

    जेसन रॉय , रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), प्रियम गार्ग, केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, उमान मलिक, सिद्धार्थ कौल

  • 03 Oct 2021 07:10 PM (IST)

    KKR अंतिम 11

    इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन, सुनील नारायण,  टीम साऊदी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

  • 03 Oct 2021 07:09 PM (IST)

    KKR vs SRH: हैद्राबादची प्रथम फलंदाजी

    नाणेफेक जिंकत केन विल्यमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे हैद्राबादचे फलंदाज थोड्याच वेळात मैदानात उतरतील.

Published On - Oct 03,2021 7:05 PM

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.