AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs KKR: केकेआरच्या खेळाडूने मारला शॉट, मैदानावरील कॅमेराच फुटला, पाहा VIDEO

सनरायजर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी केकेआरकरता महत्त्वाचा होता. दरम्यान हा सामना जिंकत केकेआरने त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.

SRH vs KKR: केकेआरच्या खेळाडूने मारला शॉट, मैदानावरील कॅमेराच फुटला, पाहा VIDEO
राशिद खान कॅमेरा पाहताना
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 4:57 PM
Share

IPL 2021: यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) 49 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR)  विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (SRH) या संघामध्ये झाला. यावेळी केकेआरने  हैद्राबाद संघाला 6 विकेट्सनी मात देत  गुणतालिकेतील चौथं स्थान कायम ठेवलं. शुभमन गिलच्या (Shubman Gill) दमदार अर्धशतकाच्या जोरावर केकेआरने विजय मिळवला. तर त्याला नितीश राणाच्या (Nitish Rana) महत्त्वपूर्ण 25 धावांचीही सोबत मिळाली. पण याच राणाने एका रांगड्या शॉटने थेट सीमारेषेवरील कॅमेराच फोडला.

केकेआरचा संघ 116 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. त्यावेळी 18 व्या शतकात हैद्राबादचा गोलंदाज जेसन होल्डर याने चौथा चेंडू टाकला असता फलंदाज नितीश राणाने चौकार खेचला. यावेळी चेंडू रोखण्यासाठी हैद्राबादचा राशिद पळाला पण त्याला त्यात यश आलं नाही. चेंडू सीमारेषेपार गेला, पण नेमका तिथे असलेल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर जाऊन आदळला. त्यामुळे कॅमेऱ्याची लेन्सच फुटली. विशेष म्हणजे चेंडू कॅमेऱ्याकडे येत असताना आणि लेन्सवर आदळताच लेन्स फुटल्याचा VIDEO ही स्पष्टपणे दिसतो आहे.

लेन्स तुटताच राणाही बाद

दरम्यान ओवरच्या चौथ्या चेंडूवर नितीश राणाने चौकार लगावला. पण लगेचच पुढच्याच चेंडूवर जेसनच्याच हाती तो बादही झाला. यष्टीरक्षक साहाने त्याचा झेल घेतला. पण राणाने गिलला साथ देत 33 चेंडूत महत्त्वापूर्ण 25 रन केले. ज्यानंतर अखेर कार्तिकने सामना फिनीश करत संघाला 6 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

सामन्याचा लेखाजोखा

आजच्या  सामन्यात नाणेफेक जिंकत हैद्राबाद संघाने प्रथम फलंदाजी निवडली. पण हैद्राबादसाठी हा निर्णय़ चूकीचा ठरला. संघातील एकाही फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. ज्यामुळे संघ केवळ 115 धावाच करु शकला. संपूर्ण संघात सर्वाधिक धावा विल्यमसन (26), गार्ग (21) आणि अब्दुल समाद (25) यांनी केल्या. याखेरीज इतरांना 10 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. केकेआरकडून वरुण चक्रवर्ती, टीम साऊदी, शिवम मावी यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली.

दरम्यान केकेआरचा संघ 116 धावांचे सोपं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात आला. यावेळी केकेआरची फलंदाजीही तशी ढासळली पण केकेआरकडून सलामीवीर शुभमनने दमदार अर्धशतक (57) ठोकत एकहाती डाव सांभाळला. त्याच्या सोबत राणाने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेर कार्तिकने 18 महत्त्वपूर्ण धावा करत सामना केकेआऱला 6 विकेट्नसनी जिंकवून दिला.

हे ही वाचा

CSK vs DC Preview: गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या संघामध्ये लढत, ‘या’ संघाचे पारडे जड, अशी असेल अंतिम 11

IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट

IPL 2021 : विराटसेना विजयी, पंजाबवर 6 धावांनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवली एन्ट्री

(In SRH vs KKR match Nitish Ranas Shot smashes camera at the boundary See video)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...