AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: हैद्राबादचा बंगळुरुवर निसटता विजय, केवळ 4 धावांनी आरसीबीचा 100 वा विजय हुकला

आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील 52 वा सामना अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर पार पडला. या सामन्यात हैद्राबाद संघाने उत्कृष्ट गोलंदाजीचे दर्शन घडवत आरसीबीला 4 धावांनी मात दिली.

IPL 2021: हैद्राबादचा बंगळुरुवर निसटता विजय, केवळ 4 धावांनी आरसीबीचा 100 वा विजय हुकला
विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करताना हैद्राबादचे खेळाडू
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 11:35 PM
Share

IPL 2021: याआधीच प्लेऑफमध्ये गेलेल्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) संघाला सनरायजर्स हैद्राबादकडून (SRH) थोडक्यात पराभव पत्करावा लागला. अवघ्या 4 धावांच्या फरकाने आरसीबी पराभूत झाली आहे. यंदाच्या पर्वातील हा 52 वा सामना अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर पार पडला. आरसीबी याआधीच प्लेऑफमध्ये गेली असून हैद्राबादचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. त्यामुळे सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा नसला तरी आरसीबीसाठी हा त्यांचा आयपीएलमधील 100 विजय असणार होता. पण अवघ्या 4 धावांच्या फरकाने त्यांना हा सामना गमवावा लागला.

सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीने गोलंदाजी निवडली. हा निर्णय सुरुवातीला त्यांच्यासाठी बरोबर ठरला. कारण आरसीबीने हैद्राबाद संघाला 141 धावांवर रोखलं. ज्यामुळे मुंबईसमोर 142 धावांचेच लक्ष्य होते. पण हे लक्ष्य त्यांना निर्धारीत 20 षटकांत पूर्ण करता न आल्याने अखेर आरसीबीचा संघ पराभूत झाला. दरम्यान 100 वा विजय मिळवण्यापासून वंचित राहिल्याने आरसीबीचा कर्णधार विराट कमालीचा निराश झालेला पाहायला मिळाला.

हैद्राबादची सुमार फलंदाजी

आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडल्याने हैद्राबादचा संघ प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला. पण संघाकडून अतिशय सुमार फलंदाजी करण्यात आली. केवळ कर्णधार केन विल्यमसन (31) आणि जेसन रॉयच्या (44) भागिदारीच्या जीवावर हैद्राबादने 141 धावांपर्यंत मजल मारली. या दोघांशिवाय होल्डर (16), प्रियम गर्ग (15) आणि शर्मासह (13) रिद्धीमान साहाने 10 धावा केल्या. तर आरसीबीकडून हर्षल पटेलने पुन्हा चमकदार कामगिरी करत 3 विकेट्स मिळवल्या. त्याच्याशिवाय डॅनियल क्रिस्टियनने 2 आणि चहल, गार्टन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

मॅक्सवेल-देवदत्तची झुंज व्यर्थ

142 धावांचे आव्हान आरसीबीची तगडी फलंदाजी पाहता सोपे होते. पण संघाचे फलंदाज आज टिकून खेळू शकले नाहीत. सुरुवातीचे 3 विकेट्स गेल्यानंतर  देवदत्त पडीक्कल आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण मॅक्सवेल 40 धावांवर बाद होताच पड्डीक्कलही 41 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर अखेरच्या षटकात आरसीबीला 13 धावांची गरज होती. पण आरसीबीचा संघ केवळ 9 धावाच करु शकला. ज्यामुळे त्यांना 4 धावांनी पराभव पत्करावा लागला. हैद्राबादकडून सर्वच गोलंदाजानी उत्तम गोलंदाजी करत प्रत्येकाने एक-एक विकेट टिपली. तर आऱसीबीचा एक फलंदाज धावचीत झाला.

हे ही वाचा

VIDEO: रोहित शर्माचं नवं चँलेज, प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करुन चाहत्यांना सांगितलं ओळखायला, तुम्ही ओळखू शकता का?

शोएब अख्तरचा वेग अजूनही तसाचं, मैदानावर पुन्हा उतरत भेदक गोलंदाजी, पाहा VIDEO

IPL 2021: राजस्थानविरुद्ध तुफानी अर्धशतकानंतर बास्केटबॉल कोर्टमध्येही इशानची कमाल, पाहा VIDEO

(In RCB vs SRH match Royal Challengers Bangalores Lost match against Sunrisers Hyderabad with 4 runs)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.